यावल नगरपरिषदेच्या घनकचऱ्यात आर्थिक रकमेचा मोठा घोळ प्रशासकीय मान्यता न घेता मक्तेदारास बेकायदा मुदतवाढ?

Featured जळगाव
Share This:

यावल नगरपरिषदेच्या घनकचऱ्यात आर्थिक रकमेचा मोठा घोळ प्रशासकीय मान्यता न घेता मक्तेदारास बेकायदा मुदतवाढ?

महाविकास आघाडीच्या राज्यात कलर झेरॉक्स ठेकेदाराची चांदी.

यावल (सुरेश पाटील): यावल नगरपरिषदेच्या घनकचऱ्यात आर्थिक रकमेचा मोठा घोळ करण्याच्या उद्देशाने प्रशासकीय मान्यता न घेता घनकचरा संकलन करून वाहतूक करणाऱ्या मक्तेदारास बेकायदा मुदतवाढ देण्यात आल्याने महाविकास आघाडीच्या राज्यात मूळ ठेकेदाराच्या नावाखाली यावल शहरातील भगव्या रंगाच्या झेरॉक्स ठेकेदारांची चांगलीच चांदी होत असल्याचे भाजप सेना पदाधिकारी कार्यकर्त्यांसह नागरिकांमध्ये बोलले जात आहे.
यावल नगरपरिषदेतील दि.3/8/2021रोजी सर्वसाधारण सभेतील ठराव क्र.1076 प्रत्यक्ष बघितला असता विषय क्रमांक 11सन2021/22या वित्तीय वर्षामध्ये घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कचरा संकलन करणे बाबत विचार विनिमय करण्यात आला तसेच चाळीसगाव येथील आर.एम.भालेराव(यावल नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी बबन तडवी हे रहात असलेल्या शहरातील मक्तेदार होता आणि आहे)यांना सन2020/21च्या करारनामा व कार्यादेशानुसार व तत्कालीन मंजूर दरानुसारच नवीन निविदा प्रक्रिया कार्यवाही कार्यादेश होईपर्यंत सदर कामास 14वा वित्त आयोग15वा वित्त आयोग निधी अंतर्गत मुदतवाढ देण्यात येत आहे व जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रशासकीय मान्यता घेऊन मक्तेदारास मुदत वाढ देण्यात यावी तसेच निविदा प्रक्रिया राबवितांना सदर घन कचरा संकलन व अनुषंगिक कामे करणे हे14 वा वित्त आयोग/15 वा वित्त आयोग निधी अंतर्गत नुसार करण्यात यावे तसेच सदर काम वार्षिक करणे व काम समाधानकारक असल्यास अधिकतम तीन वर्षापर्यंत मक्तेदाराकडून काम करण्यास ही सभा मंजुरी प्रदान करीत आहे.
चाळीसगाव येथील मक्तेदार आर.एम.भालेराव यांचा घनकचरा संकलन करून वाहतूक करण्याचा ठेका मुदत दिनांक 19/8/2021रोजी संपलेली आहे,मूळ मक्तेदार चाळीसगाव येथील असला तरी मात्र यावल शहरातील2भगवा कलर असलेले झेरॉक्स ठेकेदार प्रत्यक्ष काम करीत असल्याने त्यांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होण्याच्या दृष्टिकोनातून बेकायदा मुदत वाढ देण्यात आली आहे किंवा कसे तसेच मक्तेदार याच्या ठेक्याची मुदत जर 19/8/2021 रोजी संपणार होती तर त्याआधी यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अध्यक्षा उपाध्यक्ष व संबंधित नगरसेवकांनी घनकचरा वाहतूक संदर्भात प्रक्रिया पूर्ण करण्याची कार्यवाही का केलेली नाही हा कायदेशीर प्रश्न उपस्थित होत आहे, शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षा सौ. सुरेखा कोळी यांच्या कार्यकाळात घनकचरा संकलन आणि वाहतूक करण्याच्या मक्तेदारीत आणि विद्यमान ठेकेदाराला दिलेल्या मक्तेदारीत मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रमाणात वाढ करण्यात आल्याचे सुद्धा बोलले जात आहे.
दि.3ऑगस्ट2021रोजी सर्वसाधारण सभेत ठराव क्र.1076 सन 2021/22 या वित्तीय वर्षामध्ये घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत घनकचरा संकलन करणे बाबत विषयाची सूचना माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल वसंतराव पाटील यांनी मांडली तसेच या विषयाला अनुमोदक म्हणून राकेश कोलते यांनी मान्यता दिली असली तरी या विषयावर यावल नगरपरिषद मुख्याधिकारी किंवा संबंधित यांच्याकडून काही टिपणी नोंद आली आहे का?आणि या विषयावर टिपणी नसेलतर विषय अधिकृत आहे किंवा बेकायदा आहे याबाबत जिल्हाधिकारी जळगाव यांनी चौकशी करून घनकचरा संकलन करून वाहतूक करण्याच्या मक्तेदाराला जी मुदतवाढ देण्यात आली आहे ती कायदेशीर आहे की बेकायदेशीर याबाबत चौकशी करून कार्यवाही करावी असे यावल करांमध्ये बोलले जात आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *