
नियम झुगारून रातराणी पान टपरी रात्री दोन वाजेपर्यंत सुरू-अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या पोलिसांचे दुर्लक्ष
नियम झुगारून रातराणी पान टपरी रात्री दोन वाजेपर्यंत सुरू-अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या पोलिसांचे दुर्लक्ष
यावल (सुरेश पाटील): काल दि.6मंगळवार रोजी कोरोनामुळे शासकीय यंत्रणेच्या दृष्टीवर विपरीत परिणाम यावल शहरात तालुक्यात 75 टक्के लोकांच्या तोंडावर मुख्य पट्टी नाही आणि सुरक्षित अंतरही खड्ड्यात असे ऑनलाइन वृत्त तेज समाचार मध्ये प्रसिद्ध झाल्याने यावल शहरातून अनेकांनी तेज समाचार या ऑनलाईन वृत्ताचे चे सामुदायिकरित्या तसेच व्हाट्सअप वरून वाचन करून अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्यात प्रामुख्याने यावल पोलीस स्टेशन पासून अर्धा किलोमीटर अंतराच्या आत असलेल्या यावल चोपडा रोडवर आठवडे बाजाराच्या समोर महामार्गाला लागून असलेली रातराणी नावाची पान टपरी,चहा टपरी दररोज रात्री 2 वाजेपर्यंत सुरू असते आणि यावल शहरातील इतर दुकाने कायद्याचा धाक दाखवून निश्चित अशा वेळेत बंद केली जातात याबाबत यावल शहरात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
यावल तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढती आहे जिल्हाधिकारी जळगाव प्रांताधिकारी फैजपुर भाग यांनी वेळोवेळी काढलेल्या आदेशानुसार कडक निर्बंधाची अंमलबजावणी करण्यामध्ये अनेक अधिकारी कर्मचारी वर्गाचे दुर्लक्ष होत असून त्यामुळे यावल फैजपूर शहरासह तालुक्यात ठिकाणी 75 टक्के नागरिक आपल्या तोंडावर मुख्य पट्टी आणि सुरक्षित अंतर ठेवीत नाहीत अनेक जण कोरोना नियम झुगारून आपापले किरकोळ व्यवसाय हात मजुरी ची कामे करीत आहेत यामुळे कोरोना विषाणूला पोषक असे वातावरण निर्मिती झाली आहे तरी यावल, फैजपूर पोलीस.यावल फैजपूर नगरपालिका व संबंधित सर्व यंत्रणेने कोणताही भेदभाव पक्षपातीपणा न करता जिल्हाधिकारी जळगाव व प्रांताधिकारी फैजपूर यांच्या आदेशानुसार तात्काळ कडक कारवाई करावी असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.
यावल पोलीस स्टेशन पासून अर्धा किलोमीटर अंतराच्या आत यावल चोपडा रोड महामार्गाला लागून रातराणी पान टपरी आणि चहा टपरी रात्री 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा अधिकृत परवाना कोणी दिलेला आहे का? यावल पोलीस व पोलिस शासकीय वाहन या चहा टपरी जवळून दिवसा व रात्री अनेक वेळा जा, ये, करतात हे पोलिसांच्या लक्षात येत नसल्याने तसेच कार्यवाही करीत नसल्याने इतर व्यवसायिक सुद्धा आपले व्यवसाय सुरु करण्याच्या तयारीत आहेत.