कोरोनातून बरे झाल्यानंतर तुम्हाला ‘ही’ लक्षणे असतील तर अजिबात दुर्लक्ष करू नका

Featured देश
Share This:

 

नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): संपूर्ण महाराष्ट्रभर गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असताना नवीन आजार डोकं वर काढत आहेत. त्यातच कोरोनातून बरं झाल्यानंतरही अनेकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झाल्यानंतरही काही लक्षणे दिसल्यास त्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

मधुमेह तसेच हृदयरोग असलेल्या व्यक्तींना छातीत अस्वस्थता, वेदना, हृदयाचे ठोके अनियमित होणे आणि काही न करता सहज थकवा येणे असे प्रकार होतात. त्याचबरोबर, मधुमेह असणाऱ्यांना इन्सुलिन रेगुलेशनला हा विषाणू बाधित करू शकतो. त्यामुळे वेळोवेळी रक्तातील साखर तपासणे आणि ग्लुकोजची तपासणी करणे गरजेचे आहे. वरीलप्रमाणे लक्षणे कोरोनातून बरं झाल्यानंतरही असतील, तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे.

हाता पायाला मुंग्या येणे किंवा स्पर्श न जाणवणे, जास्त तहान लागणे, जास्त भूक लागणे तसेच थकवा येणे. अशा प्रकारची लक्षणे असतील तर आपण त्याला गंभीरपणे घेऊन डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. मूत्रपिंडाचा आजार असलेल्या लोकांनी वारंवार लघवी करणे, लालसर लघवी होणे, पायाला सूज येणे आणि भूक न लागणे अशा प्रकारची लक्षणे असतील तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.

कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना वरीलपैकी कोणत्याही लक्षणांचा जर सामना करावा लागत असेल तर त्यांनी लगेच तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. कारण वेळीच उपचार मिळाल्यानंतर पुढे होणाऱ्या परिणामांना तोंड द्यावे लागणार नाही.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *