
JEE,NEET परीक्षा झाली तर सोनू सूद विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचवणार
JEE,NEET परीक्षा झाली तर सोनू सूद विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचवणार
मुंबई (तेज समाचार डेस्क): कोरोनाच्या (Corona) काऴातच जेईई आणि नीट (NEET) परीक्षा घेण्याचा विचार सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयानेही (SC)परीक्षा घ्यावी असा निर्णय दिला आहे. काही राज्यांनी या परीक्षेला विरोध केला असताना सोनू सूदनेही परीक्षा घेऊ नये असे म्हटले होते. परंतु आता सोनू सूदने (Sonu Sood) परीक्षा झाली तर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचवण्याचे काम करणार असल्याचे जाहीर केले आहे.
कोरोना काळात परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नये अशी प्रतिक्रिया सोनूने परीक्षेबाबत बोलताना दिली होती. सोनू सूदने कोरोनाच्या काऴात अनेक श्रमिकांना घरी जाण्यास, विविध व्यवसाय करण्यास मदत करण्यासोबतच नोकरी आणि घरे देण्याचेही काम केले होते.