
लोकांचे जीव वाचवणे हा गुन्हा असेल तर तो मी केला आहे – माजी आ. शिरीष चौधरी
लोकांचे जीव वाचवणे हा गुन्हा असेल तर तो मी केला आहे — माजी आ. शिरीष चौधरी
नंदुरबार (वैभव करवंदकर ): महाविकास आघाडीतील अल्पसंख्यांक मंत्री ना. नवाब मलिक यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेवून नंदुरबार येथील हॉटेल हिरा एक्झीक्युटीव्हमध्ये रेमडिसिवीर इंजेक्शनचा साठा असून त्याचा काळाबाजार करण्यात येत असल्याचा आरोप केला होता. अमळनेर विधानपरिषदेची माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यावर आरोप केला आहे की , यांचे नंदुरबार येथील हिरा प्रतिष्ठानचे संचालक डॉक्टर रवींद्र चौधरी यांच्या हॉटेल हिरा पॅलेस मध्ये रेमडिसिवीर इंजेक्शनचा मोठा साठा असल्याचा सांगितलं . त्यावर प्रत्युत्तर देताना माजी आमदार शिरीष चौधरी यांनी हीरा एक्झिक्युटिवे येथे पत्रकार परिषदेत सांगितले की , जनतेच्या जीव वाचवण्यासाठी रेमडिसिवीर इंजेक्शनचे आम्ही वाटप केले आहे. लोकांचे जीव वाचवणे हा गुन्हा असेल तर तो आम्ही केला आहे.
खान्देशात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रूग्णांना रेमडीसीवर इंजेक्शनासाठी दारोदार फिरावे लागत आहे. त्यासाठी हीरा उद्योगसमूहाने पुढाकार घेऊन ” ना नफा ना तोटा ” ह्या तत्वावर कंपनीकडून इंजेक्शन विकत घेऊन रुग्णांपर्यंत पोहोचविले आहे. श्री शिरीष चौधरी म्हणाले की, आमच्याकडे विविध व्यवसायांपैकी एच.पी. ड्रग ह्या नावाने औषध उत्पादन करण्याचे लायसन आहे. या माध्यमातून आमचे औषध उत्पादन करणाऱ्या कंपनीशी संबंध आहेत. ज्या कंपन्या रेमडिसिवीर इंजेक्शन बनवतात त्या कंपनीकडून आम्ही इंजेक्शन घेतली. मंत्री महोदय ना. नवाब मलिक आपण शासनाकडून परमिशन काढून दिली तर काही तासातच एक लाख रेमडिसिवीर इंजेक्शन मी उपलब्ध करू शकतो. आपण जिथे सांगाल तेथील रुग्णांना देण्याची व्यवस्था देखील मी करू शकतो आम्ही कुठलाही काळाबाजार करत नाही. काळा बाजार करायचा राहिला असता तर आम्ही जीएसटी टॅक्स भरुन पक्के बिल घेऊन. कंपनीकडून इंजेक्शन विकत घेतले नसते. तसेच ज्या रुग्णांना आम्ही इंजेक्शन दिले त्यांच्याकडून देखील आम्ही संपूर्ण पेपर घेतले आहेत. बाजारात रेमडीसीवर इंजेक्शनच्या काळा बाजारात मोठ्या प्रमाणात विकले जात होते, म्हणून काही प्रमाणात असलेला इम्पोर्टचा साठा रुग्णांपर्यंत पोहोचविला यात आम्ही गुन्हा केला ? जर या कोरोनाच्या महामारीत मृत्यूचे ढीग लागत असतील तर , लोक प्रतिनिधी म्हणून आम्ही ते बघताच राहू हे कुठपर्यंत योग्य आहे?
आमच्या हिरागृपकडे एक्स्पोर्टचा परवाना आहे. त्या आधारे आम्ही सरळ कंपन्यांकडून रेमडिसिवीर इंजेक्शन मागवले होते. सुमारे साडे सात हजार रुग्णांना आम्ही हे इंजेक्शन वाटले आहे. मात्र, ज्यांनाही हे इंजेक्शन दिले आहे, त्या रुग्णांचे सिटी स्कॅन रिपोर्ट, कोरोना पॉझिटीव्ह रिपोर्ट, आधार कार्ड आणि एमडी डॉक्टरांनी लिहून दिलेले प्रिस्क्रीप्शन एवढया कागदपत्रांची पडताळणी करुनच वाटप केले आहे.त्यामुळे यात कुठलाही काळाबाजार झालेला नाही. आमच्याकडे कोणताही साठा नाही. आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी इंजेक्शनचे रितसर वाटप केले आहे. अजूनही राज्यात लाखो लोकांना या इंजेक्शनची गरज आहे. यासाठी आम्ही निर्यातबंदी असलेल्या इंजेक्शनचे वितरण करण्यास परवानगी द्यावी, सरकार सांगेल त्याठिकाणी आम्ही त्याचे वाटप करु, अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती. अन्न व औषधी प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनीही याबाबत राज्य सरकारला माहिती दिली.