
अपत्ये ही ‘अल्लाहची देन’ असेल,तर त्यांच्यासाठी सोयी-सुविधा आणि विशेष आरक्षण सरकारकडे का मागता ?
अपत्ये ही ‘अल्लाहची देन’ असेल,तर त्यांच्यासाठी सोयी-सुविधा आणि विशेष आरक्षण सरकारकडे का मागता ?
खासदार शफीकुर्रहमान यांना हिंदु जनजागृती समितीचा सवाल !
यावल (सुरेश पाटील): उत्तर प्रदेशमधील प्रस्तावित ‘लोकसंख्या नियंत्रण कायद्या’ला विरोध करतांना समाजवादी पार्टीचे संभल येथील खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनी मूल जन्माला घालणे,ही अल्लाहची देन असून नैसर्गिक गोष्टींना विरोध करणे योग्य नसल्याचे विधान केले होते.या वक्तव्यावर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी खासदार शफीकुर्रहमान यांना प्रश्न केला आहे की,मुलांना जन्म देणे आणि त्यांचे पोषण करणे,ही जर अल्लाहची मर्जी आहे,तर त्यांना धर्माच्या आधारावर सोयी-सुविधा,अल्पसंख्यांक आयोग आणि अन्य आरक्षण सरकारकडे का मागता?हिंदु जनजागृती समिती शफीकुर्रहमान यांच्या वक्तव्याचा निषेध करते, असेही रमेश शिंदे म्हणाले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथजी यांचे अभिनंदन !
उत्तर प्रदेश सरकारने ‘लोकसंख्या नियंत्रण कायदा’ आणण्याचा निर्णय घेऊन सर्व राज्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.याचे हिंदु जनजागृती समिती मनापासून स्वागत करते.या देशात धर्माच्या नावावर अल्पसंख्यांकांना एक न्याय आणि बहुसंख्यांक हिंदूंना वेगळा न्याय, हे चालणार नाही.सर्व नियम आणि कायदे भारतभरात समान असायला हवेत.लोकसंख्येचे धार्मिक संतुलन राखायचे असेल, तर‘लोकसंख्या नियंत्रण कायदा’ करणे,ही काळाची आवश्यकता आहे.लोकसंख्यावाढ ही एक राष्ट्रीय समस्या असून केंद्र सरकारने कठोर राष्ट्रीय ‘लोकसंख्या नियंत्रण कायदा’ केला पाहिजे,अशी मागणी आम्ही मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करत आहोत.