मुंबईला मी नेहमीच यशोदा मातेचा दर्जा दिला आहे – कंगना

Featured मुंबई
Share This:

मुंबईला मी नेहमीच यशोदा मातेचा दर्जा दिला आहे – कंगना

 

मुंबई  (तेज समाचार डेस्क): मुंबईला मी नेहमीच यशोदा मातेचा दर्जा दिला आहे असं म्हणत अभिनेत्री कंगना रणौतने एक ट्विट पोस्ट केलं आहे. आपल्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर देतानाच कंगनाने आता जय मुंबई, जय महाराष्ट्रचा नारा दिला आहे.

“महाराष्ट्रासह सर्वत्र असलेल्या मित्रपरिवाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. त्यांना माझा हेतू माहित आहे. माझी कर्मभूमी असलेल्या मुंबईबद्दल मला प्रेम सिद्ध करण्याची गरज नाही. मुंबईला मी नेहमीच यशोदा मातेचा दर्जा दिला आहे. जय मुंबई, जय महाराष्ट्र असे कंगनाने तिच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान मुंबई पोलिसांबद्दल केलेले वक्तव्य तसेच मुंबईची पाकव्याप्त काश्मीर बरोबर केलेली तुलना यामुळे कंगनावर सध्या कला आणि राजकीय क्षेत्रातून जोरदार टीका होत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर सातत्यानं भाष्य करत असलेल्या अभिनेत्री कंगना रणौतनं मुंबई पोलिसांची सुरक्षा घ्यायला नकार दिला होता. आपल्याला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटतेय, असं कंगना म्हणाली होती.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *