अन्ं चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या ..! सक्षम तपासाधिकारी श्री. विश्वनाथ गायकवाड यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे चोरटे गजाआड…!

Featured जळगाव
Share This:

अन्ं चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या ..! सक्षम तपासाधिकारी श्री. विश्वनाथ गायकवाड यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे चोरटे गजाआड…!

जळगाव (तेज समाचार डेस्क): खरं तर पोलीस प्रशासनाविषयी जनमाणसांत अनेक चांगले- वाईट अनुभव, समज- गैरसमज रुढ झालेले असतात. कधी कधी पोलिस प्रशासनाच्या एकूण कार्यशैलीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात, परंतु दुसरी बाजू जर आपण बघितली तर पोलिस प्रशासनावर असलेला अधिकचा कामाचा ताणही समोर येत असतो. असं असतानाही पोलिस प्रशासनात आपले सेवाकार्य चोखपणे बजावणा-या सक्षम, कर्तव्यदक्ष पोलिस अधिका-यांमुळे अनेक सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्याचे आपण बघतो. तपासाची योग्य चक्रे फिरविल्यामुळे अनेक छोटे- मोठे गुन्हे उघडकीस येत असतात. परिणामी जनमानसात पोलीस प्रशासनावरची विश्वासहार्यता यामुळे अधिक बळकट होत असते. असाच चांगला आणि सुखद अनुभव मला आला.

शनिवार दिनांक 18/ 10/ 20 रोजी रात्री आमच्याकडे चोरी झाली होती. चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी आमच्या घरासह शेजारच्या चार घरांच्या बाहेरून कड्या लावून घेतल्या होत्या. आमच्या हाँलमधील खिडकीचा लाँक ब्रेक करून खिडकीपासून सहा-सात फुटावरच्या बेडवरचा मोबाईल चोरट्यांनी सफाईदारपणे लंपास केला होता. सोबतच पोर्चमधील चप्पल-बुटांचे स्टँण्डदेखील नेले होते. सकाळी 5:30 वाजता आमचे शेजारचे श्री. मनोज रायसिंगे नेहमीप्रमाणे बाहेर फिरायला निघायला लागले तर त्यांचा दरवाजा बाहेरून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लागलीच मला फोन केला, परंतु माझा फोन लागला नाही. त्यानंतर त्यांनी शेजारचे अतुल सोनवणे, हिराभाऊ पाटील यांना फोन केला तर त्यांचेही दरवाजे बाहेरून बंद असल्याचे दिसून आले. सौ. रायसिंगे यांनी समोर राहणाऱ्या कविता पाटील यांना आवाज देऊन आपला बंद असलेला दरवाजा उघडून घेतला. श्री. रायसिंगे यांनी शेजारचे श्री. अतुल सोनवणे तथा हिराभाऊ पाटील यांचे बंद असलेले दरवाजे उघडले.
सर्वांनी आपापल्या घरातील वस्तू चेक केल्या तर आमच्या बेडवरील मोबाईल मिळून आला नाही. तसेच पोर्चमधील चप्पल-बुटांचे स्टँण्डदेखील दिसून आले नाही.

घराबाहेरचे तर सोडा पण, घरातील खिडकीपासून सहा सात फुटावरची वस्तूदेखील सुरक्षित नाही याची प्रचिती या चोरीच्या माध्यमातून आम्हाला आल्यामुळे घरातील चोरीचा हा धक्का संपूर्ण परिवाराला अत्यंत टेन्शनमध्ये टाकणारा होता.

सदर चोरीच्या घटनेसंदर्भात रविवारी सकाळी तालुका पोलीस स्टेशनला मी रितसर फिर्याद नोंदविली.

एखादी हरवलेली वस्तू जर सापडली किंवा कोणी आणून दिली तर तिचा आनंद होतोच, परंतु चोरीला गेलेली वस्तू परत मिळाली तर होणारा आनंद शब्दात मावण्याजोगा नसतो, आनंदाला पारावर नसतो. असाच आनंदाचा क्षण या केसमधील तालुका पोलिस स्टेशनचे तपासाधिकारी श्री. विश्वनाथ गायकवाड यांच्यामुळे आला.

तालुका पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मा. श्री. रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या केसमध्ये त्यांनी विशेष लक्ष घालून या प्रकरणाचा छडा लावून चोरांच्या मुसक्या आवळल्या त्याबद्दल त्यांचे विशेष आभार..!


मोबाईल सुपूर्द करतांना तालुका पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रविकांत सोनवणे. सोबत तपासाधिकारी विश्वनाथ गायकवाड.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *