
मुंबईत जाण्यास मला भीती वाटते; आता कंगणा रनौत केली ‘ही’ मागणी
नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): बाॅलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपुत याच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री कंगना रनौत सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धीस आली आहे. सुशांतसिंगच्या पोलिस तपासावरून कंंगनाने शिवसेनेला धारेवर धरलं होतं. मुंबई महापालिकेने कंगनाचं मुंबईतील ऑफिस तोडलं होतं, त्यानंतर शिवसेना आणि कंगना यांच्यात वेळोवेळी वाद झालेला पहायला मिळाला. एकदा तर बाऊंसरच्या गराड्यात ती मुंबईत दाखल झाली होती, मात्र आता याच कंगणा रनौतला मुंबईत येण्यास भीती वाट आहे.
शिवसेनेच्या चुकांबद्दल मी बोलले होते. शिवसेना आणि शिवसेनेच्या बाॅलिवूड कलाकारांबद्दल बोलल्याने, ते मला संपवण्यासाठी ते कोणत्याही थराला जातील. महाराष्ट्रात शिवसेनेचं सरकार आहे. त्यामुळे ते माझा छळ करत आहेत, असा आरोप कंगनाने केला आहे. त्याचबरोबर शिवसेनेचा माझ्यावर राग आहे. त्यांच्यापासून माझ्या जिवाला धोका आहे. मुंबईत जाण्यास मला भीती वाटते, असं कंगणानं म्हटलं आहे. यासोबतच तीने मुंबईत चालू असलेले खटले सीमल्यात चालवण्याची मागणी कंगनाने सर्वोच्च न्यायालयात केली आहे.
कंगनाविरूद्ध मुंबईच्या न्यायालयात अनेक खटले चालू आहेत. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी देखील कंगना विरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणात पुढील सुनावनीला हजर राहण्यासाठी न्यायालयाने कंगनाविरोधात जामिनपात्र वाॅरंट दाखल केलं आहे. या निर्णयाविरूद्ध कंगना आणि तिच्या बहिणीने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.
दरम्यान, माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. या प्रकरणात देशाच्या कोणत्याही न्यायालयात उपस्थित राहण्यास तयार आहे. मात्र मुंबईत जाण्यास मला भीती वाटते, असे कंगनाने म्हटलं आहे.