चक्रीवादळाची तीव्रता कमी होणार- हवामान विभाग
चक्रीवादळाची तीव्रता कमी होणार- हवामान विभाग
मुंबई (तेज समाचार डेस्क): चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे. पण पुढील सहा तासांमध्ये या वादळाची तीव्रता कमी होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली. वादळाचा परीघापैकी काही भाग अजूनही समुद्रावरच आहे. संपूर्ण वादळ जमीनीवर दाखल होण्यासाठी अजून किमान एक तासाचा वेळ लागेल. सध्या मध्यभागी या वादळाची तीव्रता 90-100 किलोमीटर प्रती तास ते 110 किलोमीटर प्रती तास इतकी आहे.