कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यानंतर किती वेळात कोरोना होतो?

Featured देश
Share This:

नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढत आहे. कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत चालली आहे. अशात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आधी कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 30 ते 40 टक्के व्यक्तींनाच कोरोनाची लागण होत होती. आता हे प्रमाण 70 ते 80 टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे.

कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यास अवघ्या मिनिटभरात तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे. याआधी कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर 10 मिनिटांनी कोरोना होण्याचा धोका होता.

कोरोनाचा विषाणू अतिशय वेगानं हातपाय पसरत आहे. आधीच्या तुलनेत त्याच्या फैलावाचा वेग वाढला आहे. आधी परिस्थिती वेगळी होती. एखादी व्यक्ती कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यानंतर १० मिनिटांनी तिला कोरोना होण्याचा धोका होता. पण आता एका मिनिटातच कोरोनाची लागण होत आहे, असं बीएलके सुपरस्पेशॅलिटी रुग्णालयाचे श्वसनतज्ज्ञ डॉ. संजीव नय्यर यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 13 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *