कशी मिळाली रियाला शवागारात जाण्याची परवानगी ?

Featured देश
Share This:

 

मुंबई  (तेज समाचार डेस्क): सुशांतसिंग मृत्यू (Sushant Singh Suicide) प्रकरणात आता मानवाधिकार आयोगाचाही प्रवेश झाला आहे. रियाला शवागारात जाण्याची परवानगी कशी मिळाली? कोणत्या नियमांतर्गत तिला परवानगी देण्यात आली, अशी नोटीस आयोगाने कूपर रूग्णालय (Cooper Hospital) आणि मुंबई पोलिसांना पाठवली आहे.

सुशांत मृत्यू प्रकरणात सीबीआय (CBI) चौकशीचा आज सहावा दिवस आहे. सुशांतच्या फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानीची सलग पाचव्या दिवशी चौकशी झाली. त्याचवेळी अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे (Riya Chakraborty) मेसेज चॅट्स उघड झाले आहेत. त्यावरून रिया एका ड्रग्ज डीलरच्या संपर्कात होती असे लक्षात येते. यानंतर याप्रकरणी अमली पदार्थांचा वापर व व्यापार दिशेने आता चाैकशी होणार असल्याचे अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाचे (एनसीबी) संचालक राकेश अस्थाना यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे.

पैशांच्या अफरातफरीची चौकशी करणाऱ्या ईडीने रिया चक्रवर्तीचे काही ‘व्हॉट्सअॅप चॅट्स’ सीबीआय आणि एनसीबी पथकाला दिले आहेत. मात्र, रियाने आजपर्यंत एकदाही अमली पदार्थांचे सेवन केले नाही, असा दावा रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी केला आहे.

रिया चक्रवर्तीच्या चॅट मॅसेज नुसार ती सॅम्युअल मिरांडासोबत ड्रग्सविषयी चर्चा करत होती असे लक्षात येते. रियाचे हे ‘रिट्रीव चॅट्स’ असून तिने ते यापूर्वी ‘डिलीट’ केले होते. पहिल्या संभाषणात ती गौरव आर्यासोबत ड्रग्सविषयी बोलते. हे मॅसेज ८ मार्च २०१७ चे आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रियाचे हे चॅट सीबीआय तसेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) कडे दिले आहेत. १० ऑगस्ट रोजी ईडीने रियाचा फोन ताब्यात घेतला होता.

चॅटमध्ये ३ गोष्टींचा उल्लेख

रियाने हार्ड ड्रग एमडीएमबद्दल या चॅटमध्ये चर्चा केली आहे. हे एक पार्टी ड्रग असून मुंबईत सहज मिळते. सॅम्युअल मिरांडाने रियाला उत्तर दिले – हॅलो रिया, स्टफ जवळजवळ संपला आहे. एका चॅटमध्ये जया साहने रियाला सांगितले होते – पाणी, चहा किंवा कॉफीमध्ये ४ थेंब घालून त्याला द्यायचे आहे. मग 40 मिनिटे लागतील.
सीबीआयने त्वरित कारवाई करावी – श्वेता सिंह

मंगळवारी रियाचे ड्रग्ज कनेक्शन लक्षात आल्यानंतर सुशांतची बहीण श्वेता सिंह कीर्तीने, ड्रग्ज बाळगणे हा गुन्हा असून सीबीआयने लवकरात लवकर याप्रकरणी कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली. ‘हा एक गुन्हा आहे. सीबीआयने त्वरित कारवाई केली पाहिजे #RheaDrugsChat’, असे ट्विट श्वेताने केले आहे. सोबतच तिने एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे.

सुशांतच्या घरी दर आठवड्याला होणाऱ्या पार्टीत दारू आणि गांजाचे सेवन केले जात होते, असे सुशांतच्या स्वयंपाक्याने सीबीआय चौकशीत यापूर्वी सांगितले होते. ईडीने १० ऑगस्टला रिया आणि तिच्या कुटुंबीयांचे ४ मोबाइल, दोन आयपॅड आणि एक लॅपटॉप जप्त केला होता. यामधूनच अमली पदार्थांचा सुगावा लागला असल्याचा दावा केला जात आहे. सुशांत अमली पदार्थांच्या सिगारेट्स ओढत होता, असे नीरज सिंहने सांगितले होते.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *