
यावल येथील हॉटेल गोकुळ परमिट रूम बियरबार सुरू होणार- राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकाचे पत्र नशेतील ?
यावल येथील हॉटेल गोकुळ परमिट रूम बियरबार सुरू होणार- राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकाचे पत्र नशेतील ?
यावल ( सुरेश पाटील ) : जळगाव येथील राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक एन. के. धार्मिक यांचे दिनांक 26 जून 2020 चे पत्र बघितले असता यावल येथील हॉटेल गोकुळ परमिट रूम बियरबार सुरू होणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे हे पत्र दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यावल यांना पुढील कार्यवाहीसाठी देण्यात आल्याचे सुद्धा दिसून येत आहे.
एन. के. धार्मिक. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क जळगाव यांचे दिनांक 26 जून 2020 चे पत्र बघितले असता त्यात दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यावल यांना माहिती व पुढील कार्यवाही करता रवाना केल्याचे दिसून येत आहे त्यात म्हटले आहे की, दुय्यम निरीक्षक यावल यांना निर्देशित करण्यात येते की माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांनी दिनांक 14 5 2020 रोजी च्या आदेशान्वये हॉटेल गोकुळ एफ.एल. क्रमांक 342 यावल तालुका यावल जिल्हा जळगाव ही अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द केली होती.
सदर आदेशाविरुद्ध अनुज्ञप्ती धारकांने माननीय आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क , महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे दाखल केलेल्या अपील अर्ज क्रमांक 113 / 2020 बाबत चे आदेशानुसार माननीय आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांचे आदेशात पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिलेली आहे.
तेव्हा सदर अनुज्ञप्ती बाबतचे आदेश संबंधित अनुज्ञप्ती धारक यांना बजावून सन 2020– 21 करिता अनुज्ञप्ती धारकांने नूतनीकरण शुल्क जमा केल्याची खात्री करून अनुज्ञप्ती सुरू करून देण्यात येऊन दिनांकित पोच व त्याबाबतचा अनुपालन अहवाल या कार्यालयास सादर करण्यात यावा असे एन. के. धार्मिक अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव यांनी लेखी स्वरूपात म्हटले आहे त्यामुळे यावल येथील हॉटेल गोकुळ परमिट रूम बियर बार सुरू होणार असल्याने ग्राहकांमध्ये मोठा आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
एन .के. धार्मिक यांचे पत्र संशयास्पद.
जळगाव येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एन. के. धार्मिक यांनी दिनांक 26 जून 2020 रोजी दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यावल यांना जे पत्र दिले आहे, ते पत्र प्रत्यक्ष बघितले असता पत्राच्या सुरुवातीलाच वाचा : 1 . माननीय आयुक्त, राज्य, उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेश क्रमांक एफएलआर–182020 / 113 / 1, मुंबई 23 जून 2020
2 , अनुज्ञप्तीधारक नितीन श्रावण सोनार हॉटेल गोकुळ एफएल –3 क्र.342 यावल तालुका यावल. जिल्हा जळगाव यांचा नूतनीकरणाचा अर्ज. असे स्पष्ट नमूद आहे.
हॉटेल गोकुळ बियर बार परमिट रूम परवाना जळगाव जिल्हाधिकारी यांनी दिनांक 14 5 2014 रोजी च्या आदेशान्वये कायमस्वरूपी रद्द केला होता आणि आहे मग असे असताना वाचा क्रमांक 2 नुसार नूतनीकरणाचा अर्ज आला कुठून ? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून जळगाव येथील अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांचे पत्र टाईप करताना कोणाची काय चूक झाली ? तसेच कोणी नशेत होते का ? याबाबत सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या दिलेल्या पत्राबाबत राज्य उत्पादन शुल्क जळगाव अधीक्षक कार्यालयाकडून लेखी खुलासा करण्यात यावा असे यावल तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात बोलले जात आहे.