
धुळे : बाजारात मोकाट फिरतोय क्वारंटाइन रुग्ण
धुळे (तेज समाचार). कोरोना वायरस आपल्या देशांत दिवसेनदिवस गंभीर होत चालला आहे, तरीही लोकांना याचे गांभीर्य कळलेले नाही. ज्या मरीजांना कोरंटाइन होण्यासाठी सांगण्यात आले आहे, ते सुद्धा कोरोना वायरस चे गांभीर्य लक्षात घेत नाही आहे आणि मोकाट फिरत आहे. सोमवारी शहरात होम क्वारंटाइनचा शिक्का मारलेला एक तरुण बाजारपेठेतून बाजार करून साक्री रोडवरील घराकडे जाताना महापालिकेच्या पथकाला दिसला. लगेच त्यांनी शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केली.
– पुण्याच्या दौंड येथुन आला आहे तरुण
शहरातील साक्रीरोड मोगलाई परिसरातील एक तरुण काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील दौंड येथून धुळ्यात आला होता. तपासणी करून त्याला होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मात्र, या तरुणाने हातावरचा शिक्का पुसून सोमवारी सकाळी तो साक्रीरोड परिसरातील बाजारपेठेतून बाजार करून घराकडे जात होता. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाला संबंधित तरुणाविषयी माहिती मिळताच त्यांनी त्याला पकडून शहर पोलिस ठाण्याशी संपर्क करीत पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस हेमंत पाटील यांनी तरुणाकडून सर्व माहिती घेत कारवाई केली आहे. या तरुणाने होम क्वारंटाइन शिक्का दोन वेळा पुसून टाकल्याची माहितीही पोलिसांनी मिळाली.