इंटरनेट ऑफ थिंग्स या विषयावर पाच दिवसीय राष्ट्रीय प्राध्यापक विकास चर्चासत्र संपन्न

Featured महाराष्ट्र
Share This:

इंटरनेट ऑफ थिंग्स या विषयावर पाच दिवसीय राष्ट्रीय प्राध्यापक विकास चर्चासत्र संपन्न

शेगाव (तेज समाचार डेस्क): श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात परमाणु आणि दूरसंचार विभागातर्फे केंद्र सरकारच्या अटल अकॅडेमी, अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद (एआयसीटीई), नवी दिल्ली यांच्या अर्थसहाय्याने पाच दिवसीय राष्ट्रीय प्राध्यापक विकास कार्यक्रमाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. २ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट च्या दरम्यान हे चर्चासत्र ऑनलाइन प्लाटफॉर्मद्वारे घेण्यात आले. या चर्चासत्रासाठी देशभरातून विविध राज्यांमधून जवळपास दोनशे प्राध्यापक व उद्योग जगातील व्यक्तींनी सहभाग नोंदणी केली होती.

पाच दिवस चालणाऱ्या या चर्चासत्रात केन्द्रीय इलेक्‍ट्रॉनिकी अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान पिलानीचे मुख्य वैज्ञानिक डॉ. भाऊसाहेब बोत्रे यांनी अत्याधुनिक ऑटोमेशन चा वापर शोध, संशोधन आणि तंत्रज्ञानाचा विकास करण्याच्या विविध बाबींवर लक्ष वेधले.

सी.डॅक हैद्राबादचे सहसंचालक श्री. संतोष सॅम कोशी यांनी इंटरनेट ऑफ थिंग्ज विकसित करण्यासाठी असलेले नवनवीन मानक व प्रोटोकॉल विषयी माहिती दिली.

जैन इरिगेशन सिस्टम लि. चे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. अभिजित जोशी यांनी कर्नाटकातील रामथल स्वयंचलित ठिबक सिंचन प्रकल्पाबद्दल माहिती दिली. या प्रकल्पामध्ये इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) चा वापर केल्यामुळे पारंपारिक प्रकल्पांच्या तुलनेत शेतांना पाण्याची वितरण व्यवस्था सुरळीत करता आली. अशी माहिती त्यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथील डॉ. एस. बी. देवसरकर, यांनी “भविष्यातील कार्यबल विकास: विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भूमिका” या विषयावर मार्गदर्शन केले.

होम व रिसॉर्ट मध्ये इंटरनेट ऑफ थिंग्ज चा वापर करून प्रगत देशात तसेच भारतातल्या मेट्रो शहरांमध्ये कसे प्रगत ऑटोमेशन केले जात आहे याविषयी माहिती नेट्विन फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांचे संचालक श्री. अरविंद महापत्रा यांनी दिली.

श्री. मनीष जोशी, व्यवस्थापक, सायंटेक टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, इंदोर यांनी “इलेक्ट्रॉनिक्स वस्तू डिझाईन लाईफ सायकल” मधील वेगवेगळ्या टप्यात कसे काम करावे याविषयी माहिती दिली.

महाविद्यालयातील प्राध्यापक व चर्चासत्राचे समन्वयक डॉ. प्रविण वानखेडे यांनी इंटरनेट ऑफ थिंग्ज हार्डवेअर प्लॅटफॉर्म निवड आणि जास्त उत्पादन करण्याकरिता हार्डवेअर डिझाईन कसे करावे याकडे लक्ष वेधले. तसेच त्यांनी सगळ्या सहभागी झालेल्या प्राध्यापक कडून हार्डवेअर, क्लाउड, मोबाईल ॲप डेव्हलपमेंट वर प्रात्यक्षिक घेतली.

राकुटेन, जपान या कंपनीचे क्लाउड उत्पादन विकास व्यवस्थापक, श्री अनिल धनगर यांनी क्लाउड कम्प्युटिंग चा वापर कशा पद्धतीने करावा यावर मार्गदर्शन केले.

इंवेंट इंडिया इंनोवेशन, अहमदाबाद येथील श्री प्रतिक बाहेती यांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूसाठी लागणाऱ्या उत्पादन चाचण्या व प्रमाणपत्रे बद्दल माहिती दिली. तसेच मिक्रोफिशियाल इंटेलिजन्स, पुणे चे संस्थापक श्री. विशाल औताडे यांनी पीसीबी डिझाईन ऑनलाईन प्लॅटफॉर्म द्वारे प्रात्यक्षिक करून घेतले.

महाविद्यालयाचे संचालक मा. श्री. श्रीकांतदादा पाटील, प्राचार्य डॉ. एस. बि. सोमाणी, परमाणु आणि दूरसंचार विभागाचे प्रमुख डॉ. जि. एस. गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. प्रविण वानखेडे यांनी काम पाहिले

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *