स्थानिक पातळीवरील निवडणूका एकाच वेळी घ्या

Featured जळगाव
Share This:

स्थानिक पातळीवरील निवडणूका एकाच वेळी घ्या

-अशोक सब्बन
राज्य अध्यक्ष
भारतीय जनसंसद

यावल (सुरेश पाटील): महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्यात याव्यातअशी मागणी भारतीय जनसंसदचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक सब्बन यांनी मा.मुख्यमंत्री श्री .उद्धवजी ठाकरे व मा.निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केली आहे.
राज्यांमध्ये सुमारे 28हजार ग्रामपंचायती,360पंचायत समित्या,३४ जिल्हा परिषद, २२ महानगरपालिका,सुमारे ३६० नगरपरिषद व नगरपंचायत आहेत.यांच्या निवडणुका प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरासरी महिना दोन-तीन महिन्यांनी होत असतात.त्यामुळे त्या शहरात , तालुक्यात,जिल्ह्यात या संदर्भाने आचारसंहिता लागू होते व शासकीय कामकाज निर्णय प्रक्रियेसाठी पूर्ण ठप्प होते.शासकीय अधिकारी, कर्मचारी हे आचारसंहितेच्या नांवाखाली अनेक प्रशासकीय कामकाजाला टाळाटाळ करीत असतात.अनेक वेळा शासकीय अधिकारी कर्मचारी हे त्या-त्या निवडणुकांच्या कामकाजासाठी निवडणूक आयोगाकडे हस्तांतरित होतात.त्यांच्यावर असलेली शासकीय कामकाजाची जबाबदारी,त्यांच्या टेबलावरील कामकाज पूर्ण ठप्प पडते.त्यामुळे सामान्य नागरिक,शेतकरी,कामगार, व्यापारी,विद्यार्थी,महिला, लोकप्रतिनिधी अशा सर्वांची कामे ठप्प होतअसतात . तसेच संपूर्ण पोलिस यंत्रणाही निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी,संपूर्ण निवडणुक प्रक्रिया पूर्ण होऊन निर्णय जाहीर झाल्यानंतरही कायदा सुव्यवस्थेसाठी गुंतविली जाते.त्यामुळे पोलीस यंत्रणेकडे असलेल्या विविध गुन्ह्यांचा तपास व नागरिकांना संरक्षण व न्याय देण्याच्या कामांमध्ये मोठी कुचराई व दिरंगाई होते.एकंदरीत सततची आचारसंहिता शासकीय कामकाजामध्ये मोठा अडसर ठरते.त्याचा शारीरिक,मानसिक व आर्थिक व सामाजिक त्रास सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागतो.यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया लोकसभा- विधानसभा निवडणुकीप्रमाणे पाच वर्षातून एकाच वेळी करण्यात यावी.त्याकरिता निवडणूक आयोगाच्या सोयीप्रमाणे एका महिन्यात अनेक टप्प्यात निवडणुका घेऊन निर्णय एकाच दिवशी जाहीर करावे. त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून धोरणात्मक निर्णयावर जनतेला एकाच वेळी निकोप लोकशाहीच्या उभारणीसाठी मत कर्तव्य बजावता येईल.एकाच वेळी निवडणुका घेतल्या मुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदारसंघाबाहेरील कार्यकर्ते,लोक हे मतदारसंघ सोडून प्रचारासाठी,जमावाचा दबाव,दहशत करण्यासाठी जाणार नाहीत.राजकीय पक्षांतराची मोठी कीड व कार्यकर्त्यांची पळवा पळवी समाजामध्ये लागली आहे. निवडणुकीतील आर्थिक प्रलोभने,आश्वासने, अपप्रवृत्तींना काही प्रमाणात आळा बसेल.यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपूर्ण राज्यात एकाच वेळी घेण्याच्या दृष्टीने सध्या कोरोना महामारी च्या कारणाने संधी उपलब्ध झाली आहे.या संधीचा उपयोग करून,विशेष कायदा करून राज्यभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यात याव्यात अशी मागणी भारतीय जनसंसद चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक सब्बन,प्रदेश सचिव प्रभाकर कोंढाळकर, पिंपरी चिंचवड अध्यक्ष अँड.मोहन आडसुळ, पुणे शहर अध्यक्ष निलेश कांची,सातारा जिल्हाध्यक्ष संजय माने,जळगाव जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे,नंदुरबार जिल्हाध्यक्ष एकनाथ भाई पाटील व अहमदनगर जिल्हा अध्यक्ष सुधीर भद्रे,नामदेव घुले, अध्यक्ष,सरपंच ग्रामसंसद महासंघ कैलास पटारे,सरपंच आदर्श निर्मल व संत तुकाराम वनग्राम डोंगरगण ता.नगर यांनी केली आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *