
होळ रस्त्यावर कारच्या धडकेत एक ठार एक जखमी
होळ रस्त्यावर कारच्या धडकेत एक ठार एक जखमी.
धुळे (विजय डोंगरे ): कारने मोटर सायकल ला पाठीमागून धडक दिल्याने वनविभागातील कर्मचारी ठार झाले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुखदेव हिरामण बागुल यांच्यासोबत बापू फकीरा बिल हे दोघे मोटरसायकलवर पाठीमागे बसून शिंदखेडा हुन सोनगीर मार्गे होळ गावाकडे येत असताना बोरगाव जवळ पाठीमागून येणाऱ्या कार क्रमांक एम एच 18 / डब्यूल 2232 हिने मोटारसायकलला जोरदार धडक दिली यात मोटरसायकल दोघेजण रस्त्यावरती फेकले गेले व जखमी झाले त्यांना तातडीने उपचारार्थ नागरिकांच्या मदतीने धुळे येथील चक्कर बर्डी जवळील हिरे मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचारार्थ दाखल उपचार सुरू असताना बापू फकिरा भिल यांचा मृत्यू झाला डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले यानंतर त्यांचा मृतदेह यांचे नातेवाईकांच्या मदतीने पोस्टमार्टम साठी पाठविण्यात आला.
अपघातात मृत्यू झाल्याची वार्ता होळ गावात कळताच हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
मुलगा गणेश बापू भिल यांने पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.