
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रॉन यांच्या कानशिलात मारले! दोघांना अटक
पॅरिस (तेज समाचार डेस्क): फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांना आज एका व्यक्तीने कानशिलात लगावली! याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. (French President Emmanuel Macron has been slapped in the face on an official visit to the southeast of France.)
फ्रान्सच्या सैन्याला सेवा देणाऱ्या एका गटाने नुकतीच मॅक्रॉन यांना इस्लामवरून इशारा दिला होता. इस्लाम धर्माला सवलती दिल्याने फ्रान्सचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या सैनिकांच्या गटाचे पत्र Valeurs Actuelles मॅग्झीनमध्ये प्रकाशित झाले होते.
या मॅग्झीनमध्ये गेल्या महिन्यातही अशाप्रकारचे आणखी एक पत्र प्रकाशित झाले होते. यामध्ये गृह युद्धाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, य़ा पत्राला मॅक्रॉन यांचे सहकारी जेराल्ड डारमेनिन यांनी ‘असफल प्रयत्न’ व पत्र लिहिणाऱ्यामध्ये हिम्मत नाही, असे म्हटले होते
मॅक्रॉन हे दक्षिण पूर्वेकडील वॅलेन्समध्ये गेले होते. ते एका सभागृहातून बाहेर पडत असताना त्यांची वाट पाहत थांबलेल्या लोकांकडे गेले आणि त्यांच्याशी हस्तांदोलन करत बोलत होते. त्यातल्या एका व्यक्तीने त्यांच्याशी हस्तांदोलन केले आणि त्यांच्या कानशिलात लगावली. लगेचच मॅक्रॉन यांना सुरक्षा रक्षकांनी त्यांना मागे खेचले आणि सुरक्षित स्थळी घेऊन गेले.
#Macron se fait gifler en direct de #Tain pic.twitter.com/tsXdByo22U
—
(@AlexpLille) June 8, 2021
Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. तेज समाचार कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व तेज समाचारस्वीकारत नाही.