हुर्रे!!! आता नाही होणार अंतीम वर्षाच्या परीक्षा, उच्च शिक्षा मंत्रीचा खुलासा

Featured महाराष्ट्र
Share This:

मुंबई (तेज समाचार प्रतिनिधि). उच्च शिक्षण घेणा-या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना आता परीक्षा द्यावी लागणार नाही. या विद्यार्थ्यांना वर्षभरात मिळालेल्या गुणांवर विद्यार्थ्यांना ग्रेड दिला जाणार आहे. ही माहीती उच्चशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे.

– दो तासाच्या चर्चे नंतर निर्णय
उच्चशिक्षण घेत असलेल्या हजारो विद्यार्थी आणि पालकांची चिंता लवकरच दूर होणार आहे. अंतीम वर्षाच्या परीक्षा घ्यायच्या की नाही यासाठी शनिवारी मुख्यमंत्री, उच्चशिक्षणमंत्री आणी कुलगुरूंची व्हिडिओ कॉन्फरन्सींग द्वारे चर्चा झाली. जवळपास दोन तास या विषयावर चर्चा झाल्यानंतर काही गोष्टींवर सर्वांचे एकमत झाले आहे.

– ग्रेडवर संतुष्ट नसलेल्यांना परीक्षेची संधी
दिलेल्या ग्रेडवर जर कुणाचा आक्षेप तर तर परीक्षा देण्याची संधीही उपलब्ध करून दिली जाणार आहे. या बाबतचा अंतीम निर्णय लवकरच होईल, असे प्राजक्त तनपूरे यांनी सांगितलं आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील चिंतेत असलेल्या पालक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

– परीक्षा घेतांना घ्यावयाची काळजी
एकाही विद्यार्थ्याला विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही. याची काळजी घेऊन विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यात याव्यात. त्यासाठी नेमकी परीक्षा पद्धती आणि वेळापत्रक निश्चित करून विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील चिंता संपवली पाहिजे. त्यादृष्टीने विविध पर्याय पडताळून पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिले. अंतिम वर्षासाठी सर्व वर्षांच्या सत्रांच्या सरासरी इतके गूण किंवा श्रेणी प्रदान करण्याची तसेच श्रेणी सुधारासाठी ऐच्छिक परीक्षेचा पर्याय देण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून पाहण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

विद्यापीठांच्या परीक्षा तसेच शैक्षणिक वर्षांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील अकृषी विद्यापीठांचे कुलगुरूंसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सींग द्वारे बैठक संपन्न झाली. या बैठकीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्य सचिव अजोय मेहता, विभागाचे सचिव सौरभ विजय, तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ आदी सहभागी झाले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *