“हे राम” भजन संगीत व शोकाकुल वाातावरणात, युवा नेते, नगरसेवक तपनभाई पटेल यांना श्रद्धांजली

Featured धुळे
Share This:

“हे राम” भजन संगीत व शोकाकुल वाातावरणात, युवा नेते, नगरसेवक तपनभाई पटेल यांना श्रद्धांजली

 द्वार दर्शन (उठावणा, बेसणा) ला अनेक मान्यवर यांची उपस्थिती

शिरपूर (मनोज भावसार): “हे राम” भजन संगीत व शोकाकुल वाातावरणात युवा नेते, नगरसेवक तपनभाई पटेल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. द्वार दर्शन (उठावणा, बेसणा) ला अनेक नागरिक यांनी उपस्थिती देऊन श्रद्धा सुमन अर्पण केले.

शिरपूर येथील उद्योगपती, शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे बांधकाम सभापती, नगरसेवक तपनभाई मुकेशभाई पटेल (वय ४० वर्षे) यांचे निधन झाल्याने कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सर्वांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सोशल डिस्टनसिंगचे पालन करुन आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या मैदानावर दि. ४ ऑक्टोबर २०२० रविवारी सायंकाळी ४ ते ७ वाजे पर्यंत द्वार दर्शन (उठावणा, बेसणा) कार्यक्रम अतिशय शोकाकुल वातावरणात झाला.

उद्योगपती तपनभाई पटेल यांचे असंख्य चाहते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी माजी मंत्री अमरिशभाई पटेल, डॉ. पंकज पटेल, राजुभाई पारेख, संजयभाई देसाई, नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, केतकीबेन मुकेशभाई पटेल, कृतिबेन भुपेशभाई पटेल, कक्कूबेन पटेल, किरणबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, अंकीतभाई पारेख, शरीलभाई पटेल, जैनेशभाई देसाई, स्नेहा अंकीतभाई पारेख, मेहा शरीलभाई पटेल, दिशा जैनेशभाई देसाई, चिंतनभाई पटेल, हिरल चिंतनभाई पटेल, रीमा तपनभाई पटेल, कु. द्वेता भुपेशभाई पटेल, नैलेशभाई पटेल, रिटा पटेल, कौशिकभाई पटेल, प्रविणभाई पटेल, जनकभाई पटेल, रिक्षा पटेल, चि. आदिश, चि. प्रथ, चि. तथ्य, चि. अव्यान, परिवारातील सर्व सदस्य, नातेवाईक उपस्थित होते.

प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण यांनी केले.

कार्यक्रमाला स्वामी नारायण परिवाराचे आनंद स्वामी महाराज, आमदार काशिराम पावरा, जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, उमवि माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, भाजप प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, माजी आमदार प्रा. शरद पाटील, हस्ती बँक चेअरमन कैलास जैन, धुळे नंदुरबार जळगाव, महाराष्ट्र, गुजराथ, मध्य प्रदेश येथील सर्व पक्षाचे पदाधिकारी, नातेवाईक, प्राचार्य, मुख्याध्यापक, विविध संस्थांचे पदाधिकारी, शिरपूर शहर व तालुक्यातील महिला, पुरुष यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली.

शिरपूर शहर व तालुक्यातील शेकडो तरुणांनी तसेच तपनभाई पटेल युवा मंचचे कार्यकर्ते यांनी मुंडन करुन स्व. तपनभाई पटेल यांना श्रद्धांजली वाहिली

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रभाकरराव चव्हाण,

राहुल दंदे, पदाधिकारी व सहकारी यांनी प्रयत्न केले.

“जनक व्हीला” निवासस्थानी असंख्य मान्यवरांनी पटेल परिवाराचे केले सांत्वन –

“जनक व्हीला” निवासस्थानी माजी मंत्री खा. प्रफुल्ल पटेल, झी गृप चे मालक सुभाषचंद्र गोयल, भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस व पश्चिम बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीय, माजी मंत्री आ. जयकुमार रावल, आ. बाळासाहेब विखे पाटील, माजी खा. माणिकराव गावित तसेच अनेक मान्यवर यांनी यापूर्वी माजी मंत्री अमरिशभाई पटेल व परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *