
यावल परिसरातील विधवा महिलांना मदत
यावल परिसरातील विधवा महिलांना मदत.
मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलचा स्तुत्य उपक्रम.
यावल (तेज समाचार प्रतिनिधि): आज संपूर्ण जगावर कोरोनो या भयानक विषाणूने विळखा घातलेला आहे त्यामुळे यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे जन-सामान्य नागरिकांचे जीवन विस्कखळीत झालेले आहे , त्यांना पुरेसे अन्न सुद्धा मिळत नाही, त्यामुळे यावल परिसरातील गरीब विधवा, परिपक्ता स्रियांना, जीवनावश्यक अन्नधान्याचे किट की ज्या मध्ये गहू ,तांदूळ, साखर, डाळ, अंघोळीचा साबण, कपडे धुण्याचा साबण, आणि बिस्कीट पुडा, असलेले किट चितोडा , अट्रावल, माय सांगवी, या गावांना जवळ पास 200 नग, किटचे वाटप शाळेच्या अध्यक्षा कु.निता गजरे, सचिव धिरज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी चितोडा सरपंच तडवी मॅडम, कडू पाटील, अट्रावल सरपंच चौधरी मॅडम, उपसरपंच, तसेच नितिन व्यंकट चौधरी, तसेच माय सांगवी येथील सरपंच, उपसरपंच, सोनू धनगर,तसेच सर्व ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य, साक्षी अग्रवाल , शारदा पांडव, निलेश चौधरी, सचिन बारी यांनी अनमोल सहकार्य केले. यावल येथील मॉडर्न इंग्लिश मिडीयम स्कूलच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे