ऑनलाईन राज्यातील तज्ज्ञांकडून निरामय आरोग्याच्या टिप्स ऐकण्याची संधी

Featured नाशिक
Share This:
नाशिक – ‘चला आरोग्य संपन्न होऊ या मासिक आरोग्य चिंतनच्या फेसबुक लाईव्ह मालिकेच्या प्लॅटफॉर्म वरून देश विदेशातील आरोग्य विषयक जिज्ञासा असणाऱ्या व्यक्तींना  २१ जुलै पासून निरामय आरोग्याच्या विविध आरोग्यदायी टिप्स ऐकण्याची संधी मिळणार आहे.
संपूर्ण कुटुंबियांच्या निरामय आरोग्यासाठी, निर्विकल्प मनासाठी तसेच सामाजिक स्वास्थ्यासाठी नाशिक येथील
आरोग्य चिंतन मासिकाने समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी ‘चला आरोग्य संपन्न होऊ या’ ही आरोग्यदायी फेसबुक लाईव्ह मालिका दि. २१ जुलै पासून आयोजित केली आहे अशी माहिती मासिकाचे संपादक वैद्य विजय कुलकर्णी या व्याख्यानमालेची संकल्पना सुचवणारे आरोग्य चिंतनचे सल्लागार मिलिंद आरोलकर  आणि प्रकाशिका योगिता अमृतकर यांनी दिली.
या मालिकेत राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, आयुर्वेद व्यासपीठाचे संस्थापक कार्याध्यक्ष वैद्य विनय वेलणकर, डेहराडून येथील आयुष विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ.माधवी गोस्वामी, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे सह संचालक डॉ उमेश तागडे, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य जेष्ठ वैद्यक तज्ञ डॉ पद्माकर पंडित, नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीचे विभागीय सचिव प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी तसेच पब्लिक हेल्थ तज्ञ डॉ.श्याम अष्टेकर, आयुर्वेद सेवा संघाचे अध्यक्ष वैद्य अंबादास कुलकर्णी यांच्यासह सव्वीस मान्यवर रात्री ०८:३० ते ०८:४५ दरम्यान नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत.
मंगळवार दि. २१ जुलै रोजी डोंबिवली येथील जेष्ठ आयुर्वेद तज्ञ आणि आयुर्वेद व्यासपीठाचे संस्थापक कार्याध्यक्ष वैद्य विनय वेलणकर यांच्या व्याख्यानाने मालिकेची सुरुवात होणार आहे तर सोमवार दि. १७ ऑगस्ट रोजी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या ‘तंत्रज्ञान (gadgets) आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य’ या
 विषयावरील व्याख्यानाने या व्याख्यानमाले चा समारोप होणार आहे.
या मान्यवरांना आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आरोग्य चिंतन च्या *९८२२०७५०२१* या व्हाट्स अप नंबर वर एक दिवस आधी लेखी स्वरूपात आपल्या परिचयासह विचारावेत. आपल्या योग्य प्रश्नांचे निराकरण जेष्ठ वैद्यक आपल्या व्याख्यानातून करू शकतील असे वैद्य कुलकर्णी यांनी सांगितले.
ही वेबिनार मालिका आपणास *https://www.facebook.com/arogyachintan* या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या किंवा संगणकाच्या फेसबुक ॲप वरून पाहता व ऐकता येईल. या मालिकेत सहभागी झालेले  राज्यातील व देशातील विविध मान्यवर – नामवंत डॉक्टर त्यांचा परिचय आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा विषय पुढील प्रमाणे आहे.

?दि.२१ जुलै २०२० मंगळवार

वैद्य विनय वेलणकर

आयुर्वेद तज्ञ डोंबिवली व संस्थापक कार्याध्यक्ष, आयुर्वेद व्यासपीठ

विषय : कशी वाढवाल आपली प्रतिकार शक्ती…?

?दि.२२ जुलै २०२० बुधवार

वैद्य गोपाल सावकार

आयुर्वेद तज्ञ नाशिक.

विषय : आयुष काढ्याचा आरोग्यासाठी उपयोग

?दि.२३ जुलै २०२० गुरूवार

डॉ. श्याम अष्टेकर

रोगप्रतिबंध व सामाजिक शास्त्र तज्ञ नाशिक,

विषय : आरोग्यदायी आहार व व्यायाम

?दि.२४ जुलै २०२० शुक्रवार

डॉ. माधवी गोस्वामी

आयुर्वेदतज्ञ, हरिद्वार व रजिस्ट्रार ,आयुष विद्यापीठ डेहराडून.

विषय : गायीच्या तुपाचे औषधी उपयोग

?दि.२५ जुलै २०२० शनिवार

डॉ. गिरीश वेलणकर

फॅमिली फिजिशियन, परभणी.

विषय : योग,मार्ग निरामयाचा

?दि.२७ जुलै २०२० सोमवार

वैद्य एकनाथ कुलकर्णी

आयुर्वेद तज्ञ नाशिक

विषय : संधिवात आणि आयुर्वेद

?दि.२८ जुलै २०२० मंगळवार

डॉ.शीतल कर्णावट

फिजिशियन व मधुमेह तज्ञ नाशिक,

विषय : मधुमेह कसा टाळावा…?

?दि.२९ जुलै २०२०  बुधवार

डॉ. विजय भोकरे

फॅमिली फिजिशियन, नाशिक.

विषय : आरोग्य कुटुंबाचे

?दि.३० जुलै २०२० गुरूवार

वैद्य प्रज्ञा कुलकर्णी-तुसे

आयुर्वेद तज्ञ, नाशिक.

विषय : च्यवनप्राशचे औषधी उपयोग

?दि.३१ जुलै २०२० शुक्रवार

डॉ. कैलास सोनमनकर

आयुर्वेद त‍ज्ञ मुंबई.

विषय : जाणून घेऊ आपली पचनशक्ती

?दि.०१ ऑगस्ट २०२० शनिवार

डॉ. अभय सुखात्मे

स्त्रीरोग त‍ज्ञ, नाशिक.

विषय : सुप्रजेसाठी

?दि.०२ ऑगस्ट २०२० रविवार

वैद्य सुभाष वडोदकर

 आयुर्वेद तज्ञ,जळगाव

विषय : परसबागेतील औषधी वनस्पती

?दि.०३ ऑगस्ट २०२० सोमवार

वैद्य अंबादास कुलकर्णी

आयुर्वेद तज्ञ, नाशिक व अध्यक्ष आयुर्वेद सेवा संघ नाशिक.

विषय : आम्लपित्त आणि आवळा

?दि.०४ ऑगस्ट २०२० मंगळवार

डॉ. विकास रत्नपारखी

फिजिशियन , डॉ.हेडगेवार रुग्णालय औरंगाबाद.

विषय : अशी घ्या हृदयाची काळजी

?दि.०५ ऑगस्ट २०२० बुधवार

डॉ. गिरीश शाकुंतल

बालरोगतज्ञ, नाशिक.

विषय : लहान मुलांचा ताप

?दि.६ ऑगस्ट २०२० गुरूवार

वैद्य सुनील इनामदार

आयुर्वेद तज्ञ, कोल्हापूर.

विषय : किडनीचे विकार आणि आयुर्वेद

?दि.०७ ऑगस्ट २०२० शुक्रवार

वैद्य सुविनय दामले

आयुर्वेद तज्ञ,कुडाळ जिल्हा, सिंधुदुर्ग.

विषय : झोपेचं करू नका खोबरं !

?दि.०८ ऑगस्ट २०२० शनिवार

डॉ.गिरीश बेद्रे

कॅन्सर तज्ञ, श्री गुरुजी रुग्णालय, नाशिक.

विषय : दोन हात कॅन्सरशी

?दि.१० ऑगस्ट २०२० सोमवार

डॉ.उमेश तागडे

जॉइन्ट डायरेक्टर, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद,नवी दिल्ली.

विषय : आयुष्मान भारत आणि अन्य योजना

?दि.११ ऑगस्ट २०२० मंगळवार

डॉ. तात्याराव लहाने

संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग महाराष्ट्र.मुंबई

विषय : आरोग्य सेवा व जनतेचे आरोग्य

?दि.१२ ऑगस्ट २०२० बुधवार

वैद्य निलिमा राजगुरू

आयुर्वेद तज्ञ, नाशिक.

विषय : हळदीचे औषधी उपयोग

?दि.१३ ऑगस्ट २०२० गुरूवार

श्री.यतीन मुजुमदार

लाईट कन्सल्टंट,नाशिक.

विषय : प्रकाश योजना आणि आपले आरोग्य

?दि.१४ ऑगस्ट २०२० शुक्रवार

प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी

प्राचार्य, बीवायके कॉलेज नाशिक.

विषय :मानसिक आरोग्यासाठी मनाचे व्यवस्थापन

?दि.१५ ऑगस्ट २०२० शनिवार

वैद्य आशुतोष यार्दी

आयुर्वेद तज्ञ, नाशिक व उपाध्यक्ष आयुर्वेद सेवा संघ.

विषय : प्रकृतीच्या गमती, ओळखा आपली प्रकृती

?16 ऑगस्ट 2020 रविवार

डॉ. पद्माकर पंडित

माजी सिनेट सदस्य आरोग्य विद्यापीठ,पुणे

विषय : टेलीमेडिसीन आणि सेकंड ओपिनियन

?17 ऑगस्ट 2020 सोमवार

डॉ. दिलीप म्हैसेकर

माननीय कुलगुरू – आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक.

विषय : तंत्रज्ञान (gadgets) आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य

ही व्याख्यानमाला अधिकाधिक नागरिकांनी पहावी व ऐकावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *