महा एन जी ओ फेडरेशन व नवनिर्माण संस्था आणि संजय मेडिकल , नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने बिलाईपाडा येथे आरोग्य शिबीर

नंदुरबार
Share This:

महा एन जी ओ फेडरेशन व नवनिर्माण संस्था आणि संजय मेडिकल , नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने बिलाईपाडा येथे आरोग्य शिबीर अंतर्गत तपासणी , मास्क , सॅनिटायझर , विटामिन सी च्या गोळ्या वाटप

 

नंदुरबार ( वैभव करवंदकर ): आत्मनिर्भर भारत तसेच आत्मनिर्भर ग्रामअभियान प्रेरित महा एन जी ओ फेडरेशन द्वारे पंडित दीनदयाल उपाध्याय व महात्मा गांधी जयंती निमित्त राज्यातील सेवा संस्था संघटना व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून सेवा सप्ताहाचे आयोजन करावे असे आवाहन श्री शेखर मुदडा संस्थापक महा एनजीओ चे फेडरेशन महाराष्ट्र राज्य श्री विजय वरुडकर सहसंस्थापक महा एन जी यांचे फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांनी केले होते. सदर आवाहनाला प्रतिसाद देत नंदुरबार येथील नवनिर्माण संस्थे मार्फत आरोग्य शिबीर मास्क व स्वच्छता कीट वाटप कार्यक्रम भिलाईपाडा संपन्न झाला.
सदर कार्यक्रमात covid 19 जनजागृती विषयक माहिती देण्यात आली. ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 100 विद्यार्थ्यांना मास्क व सॅनिटायझर विटामिन सी च्या गोळ्या देण्यात आल्या. याप्रसंगी गावातील सरपंच शाळेतील मुख्याध्यापक ग्रामस्थ यांनी सहकार्य केले . उपक्रमात महा एन जी ओ फेडरेशन व संजय मेडिकल नंदुरबार यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भिलाईपाडा सरपंच मणीलाल गायकवाड , उपसरपंच दिलीप वळवी , संजय मेडिकल चे व्यवस्थापक संजय जैन , नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष रवी गोसावी , डॉ.राज तमाचेकर ,समुपदेशक शीतल शक्य, सामाजिक कार्यकर्ता संजय वळवी , अंगणवाडी सेविका अनसुबाई वळवी , मुख्याध्यापक संतोष नांद्रे , उपशिक्षिका वृषाली नांद्रे , ग्रामस्थ संजय सोनवणे , जगदीश वळवी , भलसिंग वळवी , कमलेश वळवी , दिनेश वळवी , जगन गावित , रमेश मोरे , विकास गावित , भरत वळवी , देविदास वळवी आदि उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भिलाईपाडा शाळा व नवनिर्माण संस्थेचे दिलीप पवरा ,शोभाताई मराठे यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक संतोष नांद्रे यांनी केले .

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *