भाऊ वडिलांना शिवीगाळ करू नको- म्हटल्याने बहिणीवर तलवारीने वार

Featured महाराष्ट्र
Share This:

मुंबई (तेज समाचार डेस्क): दारू पिऊन आलेला भाऊ वडिलांना शिवीगाळ करू लागला. त्यामुळे वडिलांना शिवीगाळ करू नको असे बहिणीने म्हटले. त्यावरून भावाने बहिणीवर तलवारीने वार करून तिला जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. 4) रात्री शीतळानगर, देहूरोड येथे घडली.

तबस्सुम रेहमान शेख (वय 21, रा. शितळानगर, देहूरोड) असे जखमी बहिणीचे नाव आहे. याबाबत त्यांनी बुधवारी (दि. 4) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शाकीर हिदायत शेख (वय 24, रा. शीतळानगर, देहूरोड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख त्यांच्या माहेरी वास्तुशांतीच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांचा आरोपी भाऊ शाकीर दारू पिऊन घरी आला. त्याने वडिलांना शिवीगाळ केली. त्यामुळे फिर्यादी यांनी भावाला सांगितले की, वडिलांना शिवीगाळ करू नको. यावरून शाकीर याने शर्टमध्ये लपवलेल्या तलवारीने बहिणीवर वार केले. त्यात फिर्यादी जखमी झाल्या आहेत. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *