‘हे’ अभिनेते ड्रग अॅडिक्ट- कंगणा राणावत
‘हे’ अभिनेते ड्रग अॅडिक्ट- कंगणा राणावत
मुंबई (तेज समाचार डेस्क):अभिनेता रणवीर सिंह, रणबीर कपूर, विकी कौशल आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी यांना ड्रग्ज टेस्ट देऊन निर्दोषत्व सिद्ध करण्याचं चॅलेंज अभिनेत्री कंगणा राणावतने दिलं आहे.रणवीर सिंह, रणबीर कपूर, अयान मुखर्जी, विकी कौशल यांनी ड्रग्ज टेस्ट तपासणीसाठी रक्ताचे नमुने देण्याची मी विनंती करते, ते कोकेनचे व्यसनी असल्याच्या अफवा आहेत. त्यांनी या अफवांचा बुडबुडा फोडावा अशी माझी इच्छा आहे, असं कंगणा म्हणालीये.
चित्रपट कलाकारांची कोणत्याही राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यापूर्वी रक्त तपासणी व्हावी, अशी कंगनाची मागणी असल्याचं ट्वीट लेखक अश्वनी महाजन यांनी केलं होतं. ते रिट्वीट करत कंगनाने चौघांना आव्हान दिलंय. दरम्यान, कंगना रणावतने याआधी दिग्दर्शक करण जोहरवर निशाना साधत आपल्या ट्विटर आकाऊटवरुन ट्विट केलं होतं. या ट्विटमधीही कंगणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केलं होतं.
मी नार्कोटिक्स ब्युरोला मदत करण्यास उत्सुक आहे पण मला केंद्र सरकारकडून संरक्षण हवे आहे. मी फक्त माझे करिअरच नव्हे तर माझा जीवही धोक्यात घातला आहे, असं कंगणाने म्हटलं आहे.