“हरिभाऊ जावळे राजकीय क्षेत्रातील राजहंस होते.” – हेमंत अलोने

Featured जळगाव
Share This:

“हरिभाऊ जावळे राजकीय क्षेत्रातील राजहंस होते.” – हेमंत अलोने

यावल (सुरेश पाटील): “अनेक वर्षे राजकीय क्षेत्रात आमदार आणि खासदार राहिलेले स्वर्गीय हरिभाऊ जावळे हे राजकीय क्षेत्रातील राजहंस होते” असे प्रतिपादन दैनिक देशदूतचे संपादक हेमंत अलोने यांनी केले.
भालोद येथे श्रध्येय हरिभाऊ जावळे संस्था मित्र परिवाराने आयोजित केलेल्या “जयंतीअभिवादन समारंभात” प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस.एस.राणे(जळगांव)हे होते.मंचावर श्रीमती कल्पनाताई हरिभाऊ जावळे,शशिकांत गाजरे आदींची उपस्थिती होती.
या प्रसंगी श्रध्येय हरिभाऊ यांच्या अनेक आठवणींना उजाळा देत हेमंत अलोने यांनी त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलू उलगडले.” सामान्य जीवन जगणारे हरिभाऊ असामान्य नेतृत्व होते.सामान्य माणूस त्यांच्या जनसेवेचा केंद्रबिंदू होता.राजकारणातील अनेक जय-पराजय त्यांनी पाहिले होते. आमदार -खासदार म्हणून सत्तेची,अहंकाराची हवा त्यांच्या डोक्यात कधीच गेलेली आम्ही पहिली नाही.राजकीय,सामाजिक चारित्र्य सांभाळून त्यांनी जनसेवा केली.शेती हा भाऊंचा जिव्हाळ्याचा व अभ्यासाचा विषय होता.शेती आणि शेतकरी वर्गाच्या समस्या सोडविण्यात ते नेहमीच पुढे असलेले मी पाहिलेले आहे.सर्वांच ऐकून घेणारा त्यांचा स्वभाव हा त्यांच्यातील “देवपण” सिद्ध करणारा होता “असे ते म्हणालेत.
या प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य डॉ.एस.एस.राणे श्रध्येय हरिभाउंबद्दल म्हणाले की,” हरिभाऊ राजकारणात असूनही राजकारणी नेते नव्हते,आदर माणुसकी हे त्यांचे महत्त्वाचे गुण होते.ते राजकारणात राहून सामाजिक चळवळीतील सुधारणावादी नेते होते.त्यांच्या चारित्र,विचार आणि कृती ही एका प्रामाणिक समाजसेवकाची होती. समाजातील दुर्बल-उपेक्षित वर्गाच्या समस्या सोडविण्याची त्यांची धडपड ही निरपेक्ष भावनेने असे.राजकीय क्षेत्रात श्रध्येय हरिभाऊ यांच्या सारखी उत्तुंग व्यक्तिमत्वे अभावानेच दिसतात.भालोद परिसरातील मुला -मुलींना विशेषतः मुलींना उच्चशिक्षणाची संधी मिळावी या उदात्त हेतून त्यांनी भालोद कॉलेजची केलेली उभारणी त्यांच्या समाजसेवेची दूरदृष्टी सांगणारी आहे.भाऊ त्यांच्या विचार व कार्याने नेहमीच जनतेच्या स्मरणात वंदनीय राहतील.
या प्रसंगी हरिभाऊंचे सुपुत्र अमोल जावळे यांनी ही मनोगत व्यक्त केले.”वडिलांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात दिलेले योगदान माझ्या समोर आहे.हा जनसेवेचा आणि वैचारिक वारसा समोर ठेऊन मी नेहमीच कार्यरत राहून वडिलांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्ण करेल”.असे ते म्हणालेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक से.ए.सोसायटीचे माजी अध्यक्ष शशीकांत गाजरे यांनी तर आभार से.ए.सोसायटीचे माजी सचिव अरुण चौधरी यांनी केले.सुत्रसंचलन प्रा.डॉ.सुनील नेवे यांनी केले.कार्यक्रमास से.ए.सोसायटी संचलित सर्व विद्याशाखांमधील शिक्षक वृंद, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी,जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होते….

मेगा रिचार्ज प्रकल्प केव्हा होणार…?

स्व.माजी खासदार हरिभाऊ जावळे यांना काळाने अचानक आपल्यापासून हिरावून घेतल्याने रावेर विधानसभा मतदार संघातील तसेच रावेर लोकसभा मतदारसंघातील अनेकांच्या रास्त अपेक्षांचा भंग झालेला असून मेगा रिचार्ज हा महत्वाचा शेतकरी हिताचा व उन्नतीचा प्रकल्प होतो किंवा नाही?असा प्रश्न उपस्थित होत आहे कारण या प्रकल्पाबाबत गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्व यंत्रणा उदासीन असून याकडे लोकप्रतिनिधींचे सुद्धा दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावल रावेर तालुक्यातून होत आहे.

कॉलेजला अर्धकृती पुतळ्यासमोर अभिवादन केले….

प्राचार्य.डॉ.एस.एस.राणे,हेमंत अलोने,श्रीमती कल्पनाताई जावळे, व्हा.चेअरमन सौ.हेमलताताई इंगळे,सौ.भारती चौधरी,सौ.रजनी चौधरी, शशिकांत गाजरे,दिलीप हरी चौधरी,नारायण बापू चौधरी,अरुण चौधरी,नितीन चौधरी,भास्कर पिंपळे,सरपंच प्रदीप कोळी,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष नंदू महाजन,भाजपा सरचिटणीस यावल तालुका विलास चौधरी, उज्जैनसिंग पाटील,निलेश राणे(फैजपूर),पद्माकर महाजन, सुरेश धनके,मधुकर कारखाना चेअरमन शरद महाजन,जि प सदस्य सौ.सविता भालेराव, भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे,पंचायत समिती उपसभापती योगेश भंगाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षल गोविंदा पाटील,भाजपा माजी तालुका अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र कोल्हे,बी.के.चौधरी सर, गोपालसिंग पाटील, जिल्हा परिषद सदस्य भावी उमेदवार सलीम तडवी सर,मीनाताई तडवी, यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व हरिभाऊवर प्रेम करणारे सर्वपक्षीय कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *