औरंगाबादच्या कोविड सेंटरमध्ये महिलेसोबत घडला ‘हा’ प्रकार

Featured महाराष्ट्र
Share This:

 

औरंगाबाद  (तेज समाचार डेस्क):  औरंगाबाद मधील कोविड सेंटर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या महिलेवर तिथे उपस्थित डॉक्टरने अतिप्रसंग केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी औरंगाबादच्या पदमपुरा भागात असणाऱ्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या एका कोरोनाबाधित महिलेवर तिथे उपस्थित असलेल्या राऊंड घेणाऱ्या डॉक्टरने रात्रीचा फायदा घेत अतिप्रसंग केल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे.

महिलेवर डॉक्टरने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने आरडा ओरडा केल्याने त्या डॉक्टरने तिथून पळ काढला असंही या महिलेने सांगितलं आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित प्रकरणात नेमकी काय कारवाई करण्यात आली ते अद्याप प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं नाही.

अशातच जळगावच्या आशादीप या शासकीय वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी आणि बाहेरील इतर पुरुष कपडे काढून वसतिगृहातील महिलांना नाचायला भाग पाडत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. त्यामुळे महाराष्ट्रात होणारे स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असल्याचं चित्र दिसुन येत आहे.

औरंगाबाद शहरात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता प्रशासनाने शहरातील गर्दीची ठिकाण पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गुलमंडी, पैठण गेट, कॅनॉट प्लेस इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते त्यामुळे हा परिसर लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *