खिर्डीत छुप्या मार्गाने मिळतो गुटखा- पोलिसांनी तथा एफडीएने नियमित कारवाई करावी.

Featured जळगाव
Share This:

खिर्डीत छुप्या मार्गाने मिळतो गुटखा

पोलिसांनी तथा एफडीएने नियमित कारवाई करावी.

यावल ( सुरेश पाटील):सध्या राज्यासह जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने प्रशासनाने15एप्रिल पासून ते आजपर्यंत लॉकडाऊन घोषित केले असून या काळात प्रशासनाने काही नियमांच्या आधारे वेळेचे बंधन ठेवून अत्यावश्यक सेवेतील दुकाने,व आस्थापना यांनाच परवानगी देण्यात आली आहे.प्रशासनातर्फे कोरोना संबंधी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आव्हान सुध्दा करण्यात आले आहे.ग्रामीण भागात मात्र सर्वच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ उपलब्ध होत असून लहान गायछाप पुडी7रु.तर मोठी पुडी13रु.मिळत असून एक प्रकारे जनतेची आर्थिक लूट सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.तसेच तंबाखू,गुटखा खाणारे गुटखा बहादर सार्वजनिक ठिकाणी कोठेही पिचकारी मारत असतात.त्यामुळे कोरोनाला एकप्रकारे निमंत्रण मिळत असते.गुटखा विक्रेते म्हणतात आम्ही हप्ते देतोआमच्यावर कोणी काहीच कारवाई करू शकत नाही यावर मात्र पोलिसांकडू तसेच अन्न व औषध प्रशासना कडून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई होत नसल्यामुळे तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा विक्रीला प्रोत्साहन मिळत आहे.
राज्यात सन 2012पासून गुटखाबंदी असतानाही ‘अन्न सुरक्षा मानके कायदा’पायदळी तुडवीत रावेर तालुक्यात खिर्डी या गावात अवैधरीत्या गुटखा,पानमसाला व सुगंधित तंबाखूची राजरोसपणे सर्रास विक्री करीत आहेत कोरोना कालावधीत पान टपरीधारक टपरी बंद असल्याने पानटपरीच्या शेजारी हातात पिशव्या घेऊन छुप्या मार्गाने व उघड्यावर गुटखा विक्री सुरू असल्याचे वास्तव समोर आले आहे.
खिर्डीच्या प्रत्येक पानटपरीच्या शेजारी हातात पिशव्या घेऊन राजरोजसपणे गुटखा विकला जात असताना गुटखा विक्रेत्यांना अन्न व औषध प्रशासन विभागातील (एफडीए)अधिकाऱ्याचा आशिर्वाद तर नाही ना?असा प्रश्न आता सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे. लॉकडाऊन आणि अनलॉकमध्ये पानटपऱ्या बंद असल्या तरीही छुप्या मार्गाने खिर्डीत अवैध गुटखा विक्री सुरूच आहे.त्यामुळे तरुणाई व्यसनाधीन होत असून त्यांना कर्करोगासारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे.
अन्न व सुरक्षा मानके कायदा 2006 विनियमन 2011नुसार गुटखा विक्री करणे किंवा वितरण करणे गुन्हा ठरतो.यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन हा स्वतंत्र विभाग आहे.खिर्डी बुद्रुक मधील मराठी शाळेच्या परिसरात व बस स्टँड वरील पानटपऱ्या शेजारी हातात पिशव्या घेऊन उघड्यावर मोठ्या प्रमाणात विक्री करताना दिसतात,सदर प्रतिनिधीने स्टिंग ऑपरेशन करताना दोन वेगवेगळ्या कंपनीच्या50रुपयांच्या5 गुटख्याच्या पुड्या विकत घेतल्या.त्या ठिकाणी अन्य ग्राहकांना सहजरीत्या गुटखा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे गर्दी पण दिसून आली. त्याचे व्हिडिओ चित्रण आणि फोटो सुद्धा काढले गेले आहेत.हा साठा कुठून येतो हा सर्व सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे.
अन्य जिल्ह्यातून येतोय गुटखा:-
गुटखा व सुगंधित तंबाखू अन्य जिल्ह्यातून खिर्डीत दाखल होतोय आणि तस्करांच्या माध्यमातून पानटपऱ्यांवर पोहोचतो.गावात लॉकडाऊन असल्यामुळे घरातच गोळ्या बिस्किटे विकण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात गुटखा पाकिटे पानटपरी वाले घेऊन जातात.खिर्डी बुद्रुक मधील मराठी शाळेच्या शेजारी त्यांना गुटखा मिळत असल्याचे सदर प्रतिनिधीला दिसून आले.गुटखा विक्रेत्यांवर एफडीएचे अधिकारी कारवाई करतातच पण पोलिसांनाही कारवाई करण्याचे अधिकार आहे.या गुटखा तस्करांवर कारवाई करण्यात यावी अशी सर्व स्तरातील नागरिकांची मागणी आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *