
यावल येथे गुटखा सुगंधी सुपारी मोठे दुकानदार सोडून 3 टपरी चालकांवर कारवाई
यावल येथे गुटखा सुगंधी सुपारी मोठे दुकानदार सोडून 3 टपरी चालकांवर कारवाई.
कारवाईच्या धाकाने अनेकांनी ठेवली आपली दुकाने बंद.
अन्न व औषध प्रशासनाची चतुराई.
यावल ( सुरेश पाटील):यावल शहरात गुटखा व सुगंधी सुपारी,पान मसाला विक्रीचे काही ठराविक मोठे आणि पुरवठा करणारे विक्रेते असताना किरकोळ 3 टपरी चालकांवर काल दिनांक 8 रोजी कारवाई झाल्याने तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाची चतुराई लक्षात घेता यावल शहरात व्यापारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून कारवाईबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
संपूर्ण यावल शहरात,बुरुज चौक तथा पोलीस स्टेशन जवळील भागात,सुदर्शन चित्र मंदिर परिसरात यावल बस स्टँड परिसरात,बोरावल गेट भागात गुटका सुगंधी सुपारी व पान मसाल्याचा माल पुरवठा करणारे ठराविक व्यापारी यावल शहरात आहेत परंतु या मोठ्या दुकानदारांवर कारवाई न करता या भागात गुटखा सुगंधी सुपारी व पान मसाला किरकोळ विक्री करणाऱ्या पैकी फक्त 3 टपरी चालकांवर कारवाई करणे म्हणजे संशय व्यक्त केला जात आहे.
दिनांक8रोजी3टपरी चालकांवर कारवाई करताना अन्न सुरक्षा अधिकारी आर.एन.भरकळ, किशोर साळुंके,सुवर्णा महाजन, सहाय्यक समाधान बारी,चंद्रकांत सोनवणे यांचा समावेश होता.अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी कर्मचारी यावल शहरात गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी येत असल्याचा निरोप(मेसेज)कोणीतरी एका व्यापाऱ्यास अधिकारी-कर्मचारी येण्यापूर्वीच यावल शहरातील व्यापाऱ्यांना आधी मिळालेला होता त्यामुळे अनेकांनी यावल शहरातील आपापली दुकाने बंद ठेवली होती. गुटखा विक्रेत्यांना येण्याची पूर्व सूचना कोणी दिली हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नावावर यावल शहरातून कोणीतरी शहरातील व्यापाऱ्यांकडून वार्षिक हप्ता वसूल करीत असल्याचे सुद्धा दबक्या आवाजात संपूर्ण व्यापारी वर्तुळात बोलले जात आहे.तरी अन्न व औषध प्रशासन विभागाने निपक्षपणे सर्वस्तरीय होलसेल गुटखा विक्रेत्यांवर तसेच इतर काही जीवनावश्यक वस्तू व खाद्यपदार्थ शितपेय वस्तू विक्रेत्यांवर कारवाई करून ग्राहकांचे व नागरिकांचे आरोग्यहित जोपासावे अशी सुद्धा रास्त अपेक्षा यावल शहरातून व्यक्त करण्यात येत आहे.