
अभिनेत्री गुल पनाग ने केले योगी आदित्यानाथ चे कौतुक
मुंबई (तेज समाचार डेस्क). दिल्ली-आग्रा एक्स्प्रेस वे जवळ फिल्म सिटी उभारण्याच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयाचं कौतुक माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री गुल पनागने केलं आहे. फिल्म सिटी उभारण्याण्यासंदर्भातील निर्णय घेऊन योगींनी जी दुरदृष्टी दाखवली त्याबद्दल मी या प्रकल्पाचं स्वागच करते. योगींच्या या प्रकल्पात मलाही सहभागी व्हायला आवडेल, असं गुल पनागने म्हटलं आहे. एका वृत्तावाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ती बोलत होती.
मुंबईच्या बाहेर फिल्म सिटीची आवश्यकता असून फिल्म सिटी उभारण्याची ही योग्य वेळ आहे. वेब सीरिज आणि OTT प्लॅटफॉर्मची वाढती संख्या लक्षात घेता हे आवश्यक असल्याचं गुल पनाग म्हणाली.
दरम्यान, चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण हे बाहेर होतं. त्यामुळे दोन फिल्म सिटी झाल्या तर फायदा हाईल. त्यासोबतच फिल्म सिटी झाली तर येथे रोजगार निर्मिती होईल, असंही गुल पनागने सांगितलं.