गुढीपाडवा मुहूर्त वाळूतस्करांसाठी मोठी सुवर्णसंधी-महसूलच्या नाकावर टिच्चून अवैध गौण खनिज वाहतूक.

Featured जळगाव
Share This:

गुढीपाडवा मुहूर्त वाळूतस्करांसाठी मोठी सुवर्णसंधी.महसूलच्या नाकावर टिच्चून अवैध गौण खनिज वाहतूक.

यावल ( सुरेश पाटील): दि.13 मंगळवार रोजी गुढीपाडवा तसेच दि.14 बुधवार रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला आणि 2 दिवस शासकीय सुट्टी असल्याने यावल परिसरात व तालुक्यात वाळू तस्करांना मोठी सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे.
आज दिनांक 12 रोजी संध्याकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान यावल नगरपालिका,यावल न्यायालय व ऐतिहासिक किल्ला जवळील नदीपात्रातून वाळू तस्कर यांचे वाळूने भरलेले ट्रॅक्टर वाहतूक करीत असताना यावलकरांनी बघीतले दोन दिवस शासकीय सुट्ट्या आल्याने तसेच गुढीपाडव्याचे शुभमुहूर्त वाळू तस्करांना एक मोठी सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.यावल शहरात ठिकठिकाणी नवीन घरांचे,इमारतीचे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे.फैजपुर रोडवर हॉटेल भाग्यश्री समोर तडवी कॉलनी रोडवर नवीन यावल तहसील कार्यालयापासून विरारनगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर इतर सर्व कॉलन्या मध्ये वाळू ट्रॅक्टर आणि डंपर यांचा रात्रीच्या वेळेस तसेच सकाळी आणि संध्याकाळी अवैध वाळू वाहतूक जोरात सुरू असते अनेक ठिकाणी रस्त्यावर रस्त्याच्या बाजूला वाळूचे साठे पडलेले आहेत.बांधकामाच्या ठिकाणी वाळू येतेच कुठून?तसेच महसूल शासकीय पथकाचे शासकीय वाहनाचे गस्ती पथक हिंडत असताना त्यांना चकवा देऊन सकाळी 4 ते 7 वाजेच्या दरम्यान वाळूचे डंपर अवैध वाळू वाहतूक करतात कशी?हे गस्ती पथकाला दिसून येत नाही का? किंवा भ्रमणध्वनीवरून वाळू वाहतूकदारांना गस्ती पथकाची माहिती कोण देतो? तालुक्यात एकूण 50 ते 60 वाळू ट्रॅक्टर डंपर वाहनांची संख्या असून एक-दोन दिवसाआड फक्त एक किंवा दोन अवैध वाळू वाहतूकदारांवर नाम मात्र कारवाई होत असल्याने वाळू वाहतूक मधील हप्ते बाजी चव्हाट्यावर येत असून याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, तसेच अनेक वाळू वाहतूकदार ट्रॅक्टर डंपर मालक-चालक म्हणतात की आम्ही संबंधितांना मासिक हप्ता देत असतो त्यामुळे आमचे कोणीच काही वाकडे करणार नाही तसेच कारवाई सुद्धा होणार नाही आणि जे काही अवैध वाळू वाहतूक डंपर चालक हप्ते देत नाही त्यांच्यावरच कारवाई होते असे संपूर्ण अवैध वाळू वाहतूक धारांमध्येच बोलले जात आहे.
त्याच प्रमाणे अंजाळे शिवारात तापी नदी पात्राच्या परिसरात 8 ते 10 स्टोन क्रेशर आहेत यातील काही स्टोन क्रशर चालक-मालक तापी नदी पात्रात व किनाऱ्यावर अत्याधुनिक मशिनरीचे माध्यमातून मोठमोठे खड्डे खोदून मोठ्या प्रमाणात गौण खनिज म्हणजे डबर मुरूम काढून नाम मात्र गौण खनिजाची रॉयल्टी भरून हजारो ब्रास गौण खनिजाची रॉयल्टी बुडवून कोट्यवधी रुपयांची कमाई करून घेत आहेत यात शासनाचे मोठे आर्थिक नुकसान करीत आहेत एखाद्यावेळेस पकडले गेले तरी दोन-तीन लाखात तडजोड होऊन पुन्हा तोच खेळ सुरू होतो याकडे सुद्धा महसूल विभागाचे जाणून बुजून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप बांधकाम व्यावसायिकांसह ठेकेदारी वर्गातुन केला जात आहे अशा या गौण खनिजाची तस्करी करणाऱ्याचे हप्ते बाजीमुळे संबंधित महसूल आणि पोलिस यंत्रणेशी ओळख परिचयाचे हितसंबंध येत असल्याने तक्रारदारा विरुद्ध आणि प्रसिद्धीमाध्यमां विरुद्ध मोठे षडयंत्र रचून त्यांच्या विरुद्ध कारवाई करायची किंवा नाही याबाबत सुद्धा आपआपसात खुलेआम चर्चा होत असते तरी फैजपुर भाग प्रांताधिकारी कैलास कडलक यांनी आपल्या महसूल विभागामार्फत स्टोन क्रशर चालक-मालक आणि अवैध गौण खनिज वाहतूकदारा विरुद्ध कडक कारवाई करून तक्रारदार आणि प्रसिद्धीमाध्यमांना नाहक बदनामीचे षडयंत्र ( पत्रकार बातम्या देता म्हणून तसेच नागरिकांनी तक्रार केली आहे म्हणून कारवाई करावी लागते अशाप्रकारे संबंधित यंत्रणा दोन नंबर वाल्यांना आणि अवैध गौण खनिज वाहतूकदारांना कारवाई करताना सांगत असतात) थांबवायला पाहिजे अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *