धुळे : नवरदेवाला हळद लागण्या अगोदरच त्यांची विलगीकरण कक्षात तपासणी!

Featured धुळे
Share This:

धुळे (तेज समाचार प्रतिनिधि). कोरोना व्हायरसमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे. एक नागरीक परदेशातून मराठवाड्यात दाखल झाला त्यानंतर तो खान्देशात दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली. दुबईहुन एक नागरीक धुळ्यात दाखल झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाल्यानंतर यंत्रणा एकदम खडबडून जागी झाली.

या बाबत मिळालेली माहिती की, दुबईहुन अगोदर एक नागरीक जालन्यात दाखल झाला व त्यानंतर तो नागरीक त्याचे धुळ्यातील मुलीशी लग्न ठरले होते. त्या करीता तो कालपासूनच धुळ्यात दाखल झाला. त्याचे शुभमंगल साक्री रोड सुरत बायपास जवळील एका मंगल कार्यालयात विवाह सोहळा पार पडणार आहे. त्या करता मुलीकडील मंडळींनी स्वागता करता थाटमाट आयोजन करण्यात आले.

आज बुधवारी दुपारीच हळदीचा कार्यक्रम होणार होता व उद्या विवाह सोहळा पार पडणार असल्याने सतर्कतेच्या दोन.दृष्टीने परदेशातून जालना मार्गे धुळ्यात आलेल्या वराला प्रशासनाने अन्य नागरीकांना या व्यक्तीचा त्रास होऊ नये खबरदारी करता शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी साक्री रोड वरील लॉन्स जवळ पोहचले. परदेशातून आलेल्या त्या नागरिकाशी त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे चौकशी करून त्याला तातडीने बोलावून घेतले. काळजीच्या दृष्टीकोनातून दुपारच्या वेळी हळदीच्या कार्यक्रमाच्या अगोदर त्याला हळद लागण्याच्या अगोदरच त्या नागरीकाची खात्रीशीर ओळख पटवून त्याला खाजगी गाडीतून व पाठीमागे पोलीस व्हॅन द्वारे नागपूर सुरत बायपास जवळील हिरे मेडिकल वैद्यकीय मेडिकल कॉलेज, रुग्णालय विलगीकरण कक्षात तपासणी करण्याकरिता दाखल केले.

त्याची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतरच पुढील माहिती देण्यात येतील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अंगला हळद लागण्या अगोदरच वराला विलगीकरण कक्षात तपासणी करण्याकरिता दाखल करण्यात आल्याने मुलीकडील मंडळी चिंताग्रस्त झाली होती.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *