
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमीत्ताने विनम्र अभिवादन.
मामाचे मोहिदे प्रतिनिधी: शहादा शहरातील सावरकर प्रेमी तर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 137 वी जयंती साजरी करण्यात आली.स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतीमेस जेष्ठ कार्यकर्ते महेंद्र सोनार यांनी पुष्पमाला अर्पण करून पूजन केले.
या प्रसंगी विनोद सोनार, प्रा.ज्ञानी कुलकर्णी, डाॅ हेमंत सोनार, रोहन माळी, चंद्रकांत टेंभेकर, अजय शर्मा, विजय चौधरी, आणि सावरकर प्रेमी उपस्थित होते. उपस्थितां तर्फे पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे सच्चे देशभक्त होते. स्वातंत्र्यासाठी आपले जीवन अर्पण केले.
सावरकर हे उत्कट देशभक्त, जहाल क्रांतिकारक, तेजस्वी लेखक,कुसुम कोमल कवी,नाटककार,इतिहासकार,प्रभावी वक्ता,आणि क्रियाशील समाजसुधारक होते. स्वातंत्र्यासाठी त्यांचे योगदान मोठे श्रेष्ठ होते. अखंड भारत हे त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी ते प्रयत्नशिल होते. असे प्रतिपादन प्रा. ज्ञानी कुलकर्णी यांनी केले. उपस्थितांनी सोशलडिस्टेसिंग पाळून सावरकरांची जयंती साजरी करण्यात आली.