
संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
धुळे – संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी निवासी जिल्हाधिकारी संजय गायकवाड, नायब तहसीलदार एस. एम. जोशी, अभय कुलकर्णी, श्रीमती कल्पना पवार, श्रीमती सुनंदा पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.