rcpit

शिरपूर: आर. सी. पटेल अभियांत्रिकी आयोजीत एम एच टी-सी.ई.टी.सराव परीक्षेस विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद

Featured धुळे
Share This:

शिरपूर: आर. सी. पटेल अभियांत्रिकी आयोजीत एम एच टी-सी.ई.टी.सराव परीक्षेस विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद

 

जळगाव (तेज समाचार डेस्क): बारावी विज्ञानाची परीक्षा देवून व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचा महत्वाचा टप्पा असलेल्या एम एच टी-सी.ई.टी या परीक्षेसाठी तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्याच्या सरावासाठी येथील आर सी पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे अभियांत्रिकी प्रवेश मार्गदर्शन उपक्रमा अंतर्गत सी.ई.टी. सराव परीक्षेचे आयोजन करण्यात येत असून यात झालेल्या दोन सराव परीक्षांत खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार सह नाशिक ,मुंबई , पुणे, ठाणे, औरंगाबाद,यवतमाळ,कोल्हापूर, जालना, वाशीम तसेच भरूच, सोनगड, सेंधवा, बडवानी या गुजरात व मध्यप्रदेशातील जिल्ह्यातील 1500 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. या दोन परीक्षेच्या निकालाच्या वरून विद्यार्थ्यांची तयारी चांगल्या प्रकारे सुरु असल्याचे दिसून येत आहे. विदयार्थ्यांच्या माहितीच्या विश्लेषणानुसार या सराव परीक्षेत शहरी भागासह तालुकास्तरावरील तसेच ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्याचा सहभाग हा लक्षणीय स्वरूपाचा असल्याचे आढळून आल्याचे प्राचार्य डॉ जे.बी पाटील यांनी सांगितले.

मागील वर्षभरात कठोर मेहनत व सातत्यपूर्ण अभ्यास करून विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शालांत परीक्षा दिली. त्या नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परीक्षेच्या अभ्यासास सुरुवात केली . एम एच टी-सी.ई.टी -2020 साठी उत्साहाने तयारीस लागलेले असतांना कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने या परीक्षांच्या आयोजनात विलंब होत आहे. सदर परिस्थितीत शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच परीक्षांच्या वेळापत्रका सह परीक्षा कशी आणि कधी होईल या बाबत सर्वांच्या मनात संभ्रम व गोंधळाची भावना निर्माण झालेली आहे. कोरोना प्रादुर्भावच्या दररोज बदलणाऱ्या परिस्थितीमुळे या बाबतीत कुठलाही ठोस निर्णय अजून झालेला नाहीये. तेव्हा परीक्षा कशी , कधी व कुठे होईल या बाबतीतील शासनाद्वारे भविष्यात घेतले जाणारे निर्णय व अधिकृत माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी व अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यावर योग्य मार्गदर्शन करण्यासाठी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे व्हाटसअॅप ग्रुप तयार केलेले असून आवश्यक ती योग्य व अधिकृत माहिती विद्यार्थ्यांना पुरविली जात आहे. लवकरच परिस्थिती पूर्ववत होईल व या परीक्षा सुरळीत पणे होतील अशी अपेक्षा सर्वांनाच आहे. या कठीण परिस्थितीत सामाजिक जबाबदारी व शैक्षणिक उत्तरदायित्वाचे भान ठेवुन आर सी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयाने या परीक्षेसं सामोरे जाणार्या विदयार्थ्यांच्या पूर्व सरावासाठी एम एच टी-सी.ई.टी -2020 सराव परीक्षेचे आयोजन करण्याचे ठरविले. या अंतर्गत आता पर्यंत PCM व PCB ग्रुप साठी दोन सराव परीक्षा घेण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद व पालकाच्या सूचनेनुसार मुख्य परीक्षा होई पर्यंत दर आठवड्याला एक या प्रमाणे या प्रकारच्या सराव परीक्षा घेण्याचे महाविद्यालयाने ठरविले असून या परीक्षेत सहभाग घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या www.rcpit.ac.in अधिकृत संकेतस्थळास तसेच www.facebook.com/shirpurrcpit या फेसबुक पेज ला भेट देण्याचे आवाहन महाविद्यालायाचे कुलसचिव डॉ.प्रशांत महाजन व सराव परीक्षेचे समन्वयक प्रा. सुहास शुक्ल यांनी केले आहे. विद्यार्थ्यांनी या सराव परीक्षेत सहभाग घेऊन आपली तयारीची व अभ्यासाची पडताळणी करावी व त्या नुसार लॉकडाऊन मुले परीक्षेच्या तयारीस अधिकचा वेळ उपलब्ध झालेला आहे असे समजून धैर्याने व चिकाटीने या संकटाचे संधीत रूपांतर करावे असे आवाहनही महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.

महाविद्यालयाच्या ह्या स्त्युत्य उपक्रमाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी, संचालक तपनभाई पटेल, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रमोद देवरे, यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *