नागपूरकरांना मोठा दिलासा; कोरोना पाठोपाठ काळ्या बुरशीचे रुग्णही घटले

Featured महाराष्ट्र
Share This:

 

नागपूर (तेज समाचार डेस्क): महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला होता. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळाली होती. नागपूर विभागात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना म्युकरमायकोसिस या आजाराचे नवे संकट उभे ठाकले आहे. राज्यातील प्रत्येक शहरात काळ्या बुरशीचा स्फोट होताना दिसत होता. त्यानंतर आता नागपूरात म्युकरमायकोसिस म्हणजेच काळ्या बुरशीचा प्रभाव घटताना दिसत आहे.

गेले काही दिवस नागपूरात म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण वाढत आहेत. तुलनेत शुक्रवारचा दिवस नागपूरकरांना दिलासादायक ठरला. नागपूर विभागात शुक्रवारी दिवसभरात नव्यानं 28 जणांना या काळ्या बुरशीचे निदान करण्यात आले असून 2 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर वर्धा आणि गोंदिया आणि भंडारातही म्युकरमायकोसिसचे रुग्ण जास्त आढळत आहेत.

बुरशीची लागण झाल्यानंतर प्रकृतीत सुधारणा न झाल्यानं आतापर्यंत नागपूर विभागात 120 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. या मृत्यूतही नागपूर जिल्हा आघाडीवर आहे. म्युकरचे संक्रमण होऊन मरण पावलेल्यांपैकी 111 जण नागपूर जिल्ह्यातील आहेत. एकूण मृत्यूपैकी ही सरासरी जवळजवळ 93 टक्के इतकी आहे.

दरम्यान, नागपूर पाठोपाठ इतर जिल्ह्यात देखील काळ्या बुरशीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सांगलीत आतापर्यंत एकूण रुग्ण 207 सापडले आहेत. काळ्या बुरशीच्या रूग्णांनी लवकरात लवकर डाॅक्टरांकडून उपचार घेण्याची गरज आहे. या आजार मृत्युचे प्रमाण अधिक नसले तरी शरिरीक दृष्ट्या याचा मोठा परिणाम होऊ शकतो.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *