ग्रामपंचायत कर वसुली सुवर्ण बक्षीस योजना

Featured जळगाव
Share This:

ग्रामपंचायत कर वसुली सुवर्ण बक्षीस योजना.

ग्राम विकास अधिकारी,सरपंच, उपसरपंच यांचा स्तुत्य उपक्रम.

वराडसिम ग्रुप ग्रामपंचायतला ग्रामस्थांकडून मोठा प्रतिसाद.

यावल (सुरेश पाटील):भुसावळ तालुक्यातील वराडसिम ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या ग्रामस्थांकडे अंदाजे कोट्यवधी रुपयाची थकबाकी झाल्याने थकबाकी वसुलीसाठी ग्रामपंचायत कर वसुली सुवर्ण बक्षीस योजना हा स्तुत्य उपक्रम वराडसिम ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी गौतम वाडे,सरपंच सौ.गिता खाचणे, उपसरपंच प्रकाश ठाकूर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांनी सुरू केला.यात त्यांना ग्रामस्थांकडून सुद्धा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की ग्रुप ग्रामपंचायत वराडसीम यांनी सर्व खातेदारांकडे सन 2020– 2021व सन 2021–2022 या सालातील कर वसुली आणि थकबाकी वसुलीसाठी प्रोत्साहनपर बक्षीस योजना जाहीर केली आहे.
ग्रुप ग्रामपंचायतीची घरपट्टी पाणीपट्टी भरणारे सर्व खातेदारांमधून लकी ड्रॉ पद्धतीने लहान मुलांकडून चिठ्ठ्याद्वारे लकी ड्रॉ विशेष सभेचे आयोजन करून व्हिडिओ शूटिंग करून लकी ड्रॉ काढण्यात येईल.
बक्षिसे मध्ये प्रथम बक्षीस 2 ग्रॅम सोने, द्वितीय बक्षीस LEDटि.व्ही. किंमत 5 हजार रुपये पर्यंत, तृतीय बक्षीस एक पैठणी, चतुर्थ बक्षीस अर्धा ग्रॅम सोन्याची नथ,पाचवे बक्षीस पाच सिलिंग फॅन क्रॉम्प्टन कंपनीचे देण्यात येणार आहे.
योजना ग्रामपंचायतीच्या मासिक सभा दि.17मार्च2019चे ठराव क्र.8अन्वये घेण्यात येत आहे. सदर योजनेचा कालावधी दि.22 मार्च2021ते 30एप्रिल 2021पर्यंत राहील. सदर प्रोत्साहनपर बक्षीस योजना दवंडी व वृत्तपत्रात प्रसिद्धी दिल्यानंतर अमलात येईल सन 2020–21 या वर्षासाठीच्या ग्रामपंचायतीचा संपूर्ण कर भरणारे (थकबाकी सह) खातेदार या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
सन2020–21 सालातील संपूर्ण (घरपट्टी पाणीपट्टी थकबाकी सह) दि.30 एप्रिल2021पर्यंत ग्रामपंचायतीकडे भरावी त्यानंतर विशेष सभेची तारीख जाहीर निश्चित करून कार्यकारी मंडळाचे मत विचारात घेऊन लकी ड्रॉ काढण्यात येईल.सन2020–21 काळातील कर भरणारे खातेदारांची यादी करून ती नोटीस बोर्डावर प्रसिद्ध केली जाईल व त्या यादीतील खातेदार लोकांचा अनु क्रमांकाच्या चिठ्ठ्या करून त्याद्वारे लकी ड्रॉ काढण्यात येईल.
ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी यांना या योजनेत सहभाग घेता येणार नाही.
सर्व नियमांमध्ये बदल करण्याचा अधिकार ग्रामपंचायत प्रशासनाने राखून ठेवलेला आहे.सन 2020–21 च्या सालातील रकमेतून रुपये 7 लाख पेक्षा जास्त वसुली झाली तरच ही योजना राबविली जाईल असे ग्रुप ग्रामपंचायत वराडसिम ग्रामविकास अधिकारी गौतम वाडे,सरपंच सौ.संगीता खाचणे,उपसरपंच प्रकाश ठाकूर तसेच सर्व सदस्य व कर्मचारी गृप ग्रामपंचायत वराडसीम यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *