
ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज होणार जाहीर!
मुंबई (तेज समाचार डेस्क): शुक्रवार 15 जानेवारी रोजी राज्यातील ३४ जिल्ह्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. आज निवडणुकांची मतमोजणी होणार असून, काय निकाल लागणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी ७९ टक्के मतदान झाले. तर काही ठिकाणच्या ग्रामपंचायतीत बिनविरोधी निवडणूक पार पडली आहे. त्यामुळं आज एकूण २ लाख १४ हजार उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.
१४ हजार २३४ एकूण ग्रामपंचायतींसाठी निवडणूका होणार होत्या. परंतू १ हजार ५२३ ग्रामपंचायतींची बिनविरोध निवडणूक पार पडली. तर २६ हजार १७८ उमेदवार बिनविरोधी निवडून आले. ४६ हजार ९२१ एकूण प्रभागांमध्ये निवडणूक पार पडली. दरम्यान, राज्यातील आदर्श गाव राळेगणसिद्धी, हिवरे बाजार आणि औरंगाबाद मधील पाटोदामध्ये ३० वर्षानंतर पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. त्यामुळे या ठिकाणी काय निकाल लागणार? या निकालांवर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.