अक्कलकुवा पंचायत समितीचे सभापतीना शासकीय वाहन देण्यात यावे

Featured नंदुरबार
Share This:

अक्कलकुवा पंचायत समितीचे सभापतीना शासकीय वाहन देण्यात यावे

अक्कलकुवा  ( वैभव करवंदकर ) : महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुक आचार संहितेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने जमा केलेले अक्कलकुवा पंचायत समितीचे शासकीय वाहन जिल्हाधिकारी यांनी अद्याप पर्यंत परत न केल्यामुळे अक्कलकुवा पंचायत समितीचे सभापती व उपसभापती तसेच पं.स.सदस्य यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत अक्कलकुवा पंचायत समितीच्या सभापती मनीषा राजेश पाडवी यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांना ई-मेल द्वारे तसेच कार्यालयात निवेदन सादर केलेले आहे मात्र महिनाभरा नंतर ही जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्या मुळे पंचायत समितीच्या सर्वच पदाधिकारी यांनी रोष व्यक्त केला आहे.
सभापती मनीषा वसावे यांनी जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने अक्कलकुवा पंचायत समितीचे सभापती उपसभापती, व अधिकाऱ्यांना विविध बैठका व शासकीय दौऱ्यांसाठी तालुक्यात ये जा करणे साठी शासकीय वाहन दिलेले आहे मात्र सदर वाहन हे महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आचार संहितेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने मार्च महिन्यापासुन अधिग्रहित केलेले आहे.महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक स्थगित होऊन साडे तीन महिन्यांचा कालावधी लोटला असतांना देखील जिल्हाधिकारी कार्यालयाने अक्कलकुवा पंचायत समितीचे सभापती उपसभापती यांचे अधिनस्त असलेले वाहन परत केलेले नाही त्यामुळे सभापती व उपसभापती यांना पंचायत समितीच्या दैनंदिन कामकाजा करिता तसेच विकास कामांच्या पाहणी करण्यासाठी येणे जाणे शक्य होत नाही आहे त्यामुळे अनेक सर्व सामान्य जनतेचे काम करतांना मोठया अडचणी येत आहेत.विशेषतः कोरोना संकटाच्या काळात लोकां मध्ये जनजागृती करण्यासाठी तसेच परिस्थितीची पाहणी करणे शक्य होत नाही आहे त्यामुळे पदाधिकारीं बाबत जनतेत रोष व्यक्त होत आहे.असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, अक्कलकुवा पंचायत समितीचे शासकीय वाहन परत करणेसाठी गट विकास अधिकारी सी.के.माळी यांनी अनेक वेळा जिल्हाधिकारी कार्यालयातील वरीष्ठ अधिकाऱ्यां सोबत संवाद साधुन परिस्थितीची जाणिव करुन दिली आहे तरी देखील जिल्हाधिकारी कार्यालयाने अद्याप पर्यंत सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही असे म्हणत अक्कलकुवा पंचायत समितीचे शासकीय वाहन जनतेच्या दैनंदिन कामांसाठी तातडीने मिळावे अशी मागणी शेवटी निवेदनात करण्यात आली आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *