baban chaudhary

अतिवृष्टी बाधीत शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत करावी: महाराष्ट्र भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी

धुळे
Share This:

अतिवृष्टी बाधीत शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत करावी: महाराष्ट्र भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी

शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि मनोज भावसार): धुळे जिल्ह्यात गेल्या आठवडाभरा पासुन सतत झालेल्या पाऊस व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे पंचनामे होणे गरजेचे असून स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून मोबदला देण्याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी महाराष्ट्र भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी केली आहे. परिस्थितीची त्वरित जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, शिंदखेडा व साक्री या चारही तालुक्यातील शेतातील पिकांची पाहणी करुन शेतकर्‍यांच्या शेतपिकाची तत्काळ नुकसान भरपाई द्यावी. अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचा शेतामधील मुग, कापुस, बाजरी सह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे आधीच कोरोणाचा संकटामुळे शेतकरी सुध्दा हवालदिल झाला आहे व जिल्ह्यात गेल्या आठवडा पासुन सतत झालेल्या पाऊस व अतीवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यामुळे आर्थिक संकटात सापडला आहे नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामा करुन शासनाकडुन मदत मिळावी अशी मागणीचे निवेदन महाराष्ट्र भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी धुळे जिल्हाधिकारी संजय यादव यांना (दि.२४ आॅगस्ट) रोजी ईमेलने पाठवलेल्या पत्राव्दारे केली आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्षात शासकीय अधिकार्‍यांनी शेतातील पिकांची पाहणी करुन शासना कडून शक्य तितक्या लवकरात लवकर जास्तीत जास्त मदत देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी जिल्हाधिकारी संजय यादव धुळे यांचाकडे केली आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *