गोपीचंद पडळकरांचे मानसोपचाराकडे जाऊन औषधोपचार करावा – सागर तांबोळी

Featured नंदुरबार
Share This:

गोपीचंद पडळकरांचे मानसोपचाराकडे जाऊन औषधोपचार करावा – सागर तांबोळी ( आ.पडळकरांचा प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन )

नंदुरबार ( वैभव करवंदकर ) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार हे आमचे दैवत असून, देशाचे नेते आहेत.भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्यावर खालच्या दर्जाचे वक्तव्य केले आहे. आमदार पडळकरांची मानसिक स्थिती खराब झालेली आहे. त्यांनी मानसोपचाराकडे जाऊन औषधोपचार करून घ्यायला पाहिजे. त्याच्या खर्च नंदुरबार राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे
जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी करणार . राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय कृषी मंत्री खा.शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा निषेधार्थ काल गुरुवारी दुपारी भाजप आमदार पडळकर यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला.
धनगर समाजाच्या आरक्षणावरून महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यावर टीका करतांना भाजपचे विधान परिषद सदस्य आ. गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली. ‘शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे’ या आ. पडळकरांचा आक्षेपार्ह वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भावना संतप्त झालेल्या आहेत.
गुरुवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी यांचा नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दुपारी ४ वाजता नवापूर-साक्री रस्त्याच्या बाजूच्या मैदानावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा मार देत दहन करण्यात आले. यावेळी घोषणाबाजी करीत आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेध व्यक्त करण्यात आला.
प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी,तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, शहराध्यक्ष सागर जयस्वाल, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलु कदमबांडे,
एकलव्य आदिवासी क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र अहिरे, हंसराज पाटील,निलेश आहिरे, बॉबी बैसाणे,प्रकाश गावीत,साईकुमार गावीत उपस्थित होते.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *