
जी.एम.फाऊंडेशनचे कोविड केअर सेंटर कार्यान्वित
विरोधी पक्षनेते ना.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांनी केले उद्घाटन
जळगाव, – शहरापासून जवळच असलेल्या जी.एच.रायसोनी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी जि.एम.फाऊंडेशन मित्र परिवारतर्फे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते ना.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी आ.गिरीष महाजन यांच्या हस्ते ते सेंटर कार्यान्वित करण्यात आले.
जी.एम.फाऊंडेशन व मित्र परिवारतर्फे जी.एच.रायसोनी महाविद्यालयात ३०० पॉझिटिव्ह रुग्णांची व्यवस्था असलेले कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. मंगळवारी माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांच्या हस्ते कोविड केअर सेंटरचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी महापौर सौ.भारती सोनवणे, आ.सुरेश भोळे, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी आ.डॉ.गुरुमुख जगवानी, स्थायी समिती सभापती ऍड.शुचिता हाडा, नगरसेवक कैलास सोनवणे, भगत बालाणी, आयुक्त सतिष कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, जी.एच.रायसोनी महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक प्रीतम रायसोनी, नंदू अडवाणी, श्रीराम खटोड, मनोज काळे, अरविंद देशमुख, पितांबर भावसार, पराग महाशब्दे आदी उपस्थित होते.