
एसटी कर्मचाऱ्यांना पगार द्या, मांगणी वरून भाजपचा सरकारला अल्टिमेटम
मुंबई (तेज समाचार डेस्क). राज्य एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत पगार दिले नाहीत, तर भाजपच्या वतीने राज्यातील सर्व एसटी आगारांमध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला आहे. प्रविण दरेकर यांनी एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची भेट घेतली. यानंतर दरेकरांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी दरेकर बोलत होते.
परिवहन मंत्र्यांनी तीनशे रुपयांचा भत्ता जाहीर केला होता, पण अजूनपर्यंत अनेक कर्मचाऱ्यांना भत्ता मिळालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना भत्ता लवकरात लवकर देण्याची मागणीही आम्ही केल्याचं दरेकरांनी सांगितलं आहे. भाजपने सरकारला आठवड्याभराचा अल्टिमेटम दिला आहे. आठ दिवसात एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झाला नाही, तर भारतीय जनता पार्टी तीव्र आंदोलन करणार, असं दरेकरांनी सांगितलं आहे.