जिल्ह्यात 10 ठिकाणी जनरेशन प्लॉट उभारणार-जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण.

Featured जळगाव
Share This:

जिल्ह्यात 10 ठिकाणी जनरेशन प्लॉट उभारणार;जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण.

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांचा यावल रावेर तालुका दौरा.

यावल (सुरेश पाटील):येथील ग्रामीण रुग्णालयास जिल्हा शल्यचिकीत्सक एन.एस.चव्हाण यांनी आज दुपारी भेट देवुन कोरोना विषाणुसंसर्गाच्या पार्श्वभुमीवर तालुका आरोग्य प्रशासनाच्या संपूर्ण कामकाजाचा आढावा घेतला व कोरोनाच्या वेगाने वाढत्या संसर्गामुळे प्रशासनास सद्याच्या परिस्थितीवर अधिक सर्तक राहुन नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सुचना डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिल्या. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की जिल्ह्यात10ठिकाणी जनरेशन प्लॉट लवकरच उभारणार.
आज दुपारी यावल येथील ग्रामीणरुग्णालयास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी भेट देवुन तालुका पातळीवरील आरोग्य प्रशासनाच्या कार्याचा आढावा घेतला यावेळी यावल तहसीलदार महेश पवार,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.बी.बारेला,नगरपरिषदचे कार्यालयीन अधिक्षक विजय बडे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी नानासाहेब घोडके यांच्यासह रुग्णालयातील सर्व कर्मचारी याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी पत्रकारांशी बोलतांना डॉ.एन.एस. चव्हाण यांनी रावेर,फैजपुर,यावल तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या कोवीड सेन्टर उभारणी व रुग्णांची सातत्याने वाढणारी संख्या या संदर्भात आरोग्य प्रशासनाच्या कार्याचा आढावा देतांना जळगाव जिल्ह्यात10जनरेशन प्लांटची उभारणी करीत असुन या मुळे आपल्याला हवेतुन प्राणवायु मिळणार आहे जामनेर,पारोळा, चोपडा,अमळनेर,चाळीसगाव, मुक्ताईनगर,भुसावळ,रावेर या10 सेन्टरची आपण निवड केली असुन डीपीसीच्या माध्यमातुन हा खर्च करण्यात येणार आहे.येत्या एक दोन दिवसात भुसावळच्या प्लांटचे कार्यारंभ होणार असल्याचे डॉ.एन.एस.चव्हाण यांनी सांगीतले . सदरचे हे सेन्टर कार्यान्वित झाल्यास कोरोना रुग्णाची होणारी या रुग्णालयातुन त्या रुग्णालयात पाठवण्यासाठी होणारी हेळसांड थांबेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी यावल ग्रामीण रुग्णालयात लोकसहभागातुन उभारण्यात आलेल्या ऑक्सीजन बेड हे कार्यावत्नीत करण्या संदर्भात पत्रकारांनी विचारले असता,आपण प्रसंगी रुग्णसंख्येच्या आधारावर यावलच्या ऑक्सीजन बॅडची संख्या वाढवुन तिला रूग्णसेवेसाठी उपलब्ध करू असे त्यांनी सांगीतले.शेवटी डॉ.एन.एस.चव्हाण यांनी आरोग्य कर्मचारी यांची आस्थेने विचारपुस करून त्यांना पगार हे वेळेवर मिळत आहे किंवा नाही या प्रश्नावर त्यांनी विचारणा केली.व असलेल्या अडचण दूरध्वनीवरून तत्काळ सोडवली.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *