
महाराष्ट्र राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी गौरव बोरसे पाटील यांच्या नावाची चर्चा..!
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि). राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या पदासाठी पक्षश्रेष्ठींनी एखाद्या सामान्य कुटुंबातील,पक्षासाठी झटणाऱ्या विद्यार्थ्याला संधी द्यावी अशी सर्वच विद्यार्थी सदस्यांची मागणी आहे. अशातच उत्तर महाराष्ट्रात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी , मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पक्षाशी जोडले जावे म्हणून विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी अनेक आंदोलने ज्यांनी केलेत ते राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गौरव बोरसे पाटील यांना संधी द्यावी अशी सर्वत्र मागणी होताना दिसत आहे.
गौरव बोरसे पाटील हे धुळे शहरातील असून मूळ गाव वर्षी ता. शिंदखेडा येथील सर्वसामान्य कुटुंबातून येतात तसेच त्यांचे वडिल रावसाहेब बोरसे हे शेतकरी आहेत.धुळे शहरात महानगरपालिका निवडणुकीत आजी माजी १०-१२नगरसेवक यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असतांना गौरव बोरसे यांनी एकनिष्ठपणे विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढत होते पंचायत समिती निवडणूकीची देखील पूर्णपणे त्यांनी तयारी केली होती ऐनवेळी पक्षाने दुसरा उमेदवार दिला होता.
सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देत असतो असे म्हटले जाते तरी पक्षाने गौरव बोरसे यांचा विचार करावा अशी सर्वत्र विद्यार्थ्यांची मागणी होतांना दिसून येत आहे..!