यावल शहरात विविध ठिकाणी गटारीचे बांधकाम सुरू

Featured जळगाव
Share This:

यावल (सुरेश पाटील). नगरपरिषदेमार्फत यावल शहरात विकसित भागात अनेक ठिकाणी गटारीचे बांधकाम सुरू आहे. परंतु घर बिल्डिंग याचे बांधकाम करताना संबंधित घरमालकांनी रस्त्यावर काही प्रमाणात अतिक्रमण केल्याने गटारी बांधकाम करताना मोठा अडथळा निर्माण होत आहे, याकरता यावल नगरपालिकेने गटारीचे बांधकाम करताना एका सरळ रेषेत गटारीचे बांधकाम करण्यासाठी ठोस कार्यवाही करावी असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.

यावल शहरात तसेच विकसित भागात घर बिल्डिंग व्यवसायिक दुकानांचे बांधकाम करताना अनेकांनी यावल नगरपरिषदेकड़े बांधकामासंदर्भात घराचा नकाशा प्लॅन सादर न करता ( अनेकांनी परवानगी घेतली आहे परंतु मंजूर प्लॅन प्रमाणे घर, दुकान, इमारत इत्यादीचे बांधकाम आपल्या सोयीनुसार केलेले आहे ) अधिकृतरित्या परवानगी न घेता, तसेच काहींनी परवानगी घेतली आहे परंतु यावल नगर परिषदेच्या अटी शर्तीनुसार घराच्या चारही बाजूने मोकळी जागा न सोडता तसेच काही ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले असल्याने आता सुरू असलेल्या गटारी चे बांधकामांत मोठा अडथळा निर्माण होत आहे.

तरी यावल नगर परिषदेने गटारीचे बांधकाम ज्या ज्या ठिकाणी सुरु आहे त्या ठिकाणचे नियमानुसार रस्त्याचे रुंदीचे मोजमाप करून त्यानुसार गटारीचे बांधकाम करण्यात यावे तसेच ज्यांनी अतिक्रमण केले आहे ते गटारीचे बांधकाम करताना हटविण्यात येण्याची कार्यवाही करून गटारीचे बांधकाम एका सरळ रेषेत करण्यात यावे तसेच गटारीचे बांधकाम करताना शासकीय कामात कोणी अडथळा निर्माण करीत असल्यास त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करावी असे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *