
धुळे: गरताड बारी घाटात महामार्गावर ‘ द बर्निंग ‘कार- पहा Video
धुळे (तेज़ समाचार प्रतिनिधी) : सूरत सोलापूर महामार्गावर गरताड बारी घटक सायंकाळी 6. 30 च्या दरम्यान अचानक पणे धुळ्याहुन चाळीसगाव कडे जाणाऱ्या मारुती ओमनी व्हॅनला गरताड गावाच्या पुढील तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या घाटात म्हणजेच गरताड बारीत मारुती व्हॅनला अचानकपणे आग लागली.यात मारुती व्हॅन आगीत पूर्णपणे जळून खाक झाली. यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.
याबाबत मोहाडी पोलिसांनी अग्निशामक दलाला माहिती दिली.माहिती मिळताच अग्निशामक दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी काही मिनिटात दाखल झाले.त्यांनी आगीवर पाणी मारा करून आग आटोक्यात आणली परंतु मारुती व्हॅन पूर्णपणे जळून खाक झाली. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.आग आटोक्यात आणल्यानंतर मारुती व्हॅन क्रेनच्या मदतीने बाजूला करण्यात आली. नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
अग्नि उपद्रव 3 व 7 प्रमाणे उशिरापर्यंत मोहाडी पोलीसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
पुढील तपास पोलिस करीत आहेत.