
बांगलादेशींना ओळख पत्र देणारी टोळीचा ATS ने केला पर्दाफाश
मुंबई (तेज समाचार डेस्क). घुसखोर बांगलादेशींना भारताचे ओळखपत्रं बनवून देणारी टोळी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथका (एटीएस) ने पकडली. आठ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून विविध सरकारी कार्यालयांचे बनावट रबराचे शिक्के, बनावट पॅन कार्ड, आधार कार्ड जप्त केलेत. या प्रकरणात अकरम शेख, मोहम्मद रफीक शेख, अविन केदारे, सोहेल अब्दुल सुभान शेख, अब्दुल खैर समसुलहक शेख, अबुल हाशम ऊर्फ म्हामून काशम शेख, इद्रिस मोहम्मद शेख, नितीन राजाराम निकम या आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे मोहम्मद रफीक, मोहम्मद इद्रीस, अवीन केदारे, नितीन निकम आठ जणांनी बनावट कादपत्रांच्या सहाय्याने सुमारे ८५ बांगलादेशी घुसखोरांना व अनेक भारतीयांना देखील बनावट कागदपत्र्यांच्या आधारे पासपोर्ट मिळवून दिले आहेत. अक्रम शेख, सोहेल अब्दुल सुभान शेख, अब्दुल शेख, अबुल हाशम. अशा एकूण ४ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.