
यावल शहरात गायछाप पटेल जर्दा, विमल गुटख्यातुन लाखोंची कमाई
यावल शहरात गायछाप पटेल जर्दा, विमल गुटख्यातुन लाखोंची कमाई
यावल (तेज समाचार प्रतिनिधि): यावल शहरात गायछाप पटेल जर्दा, सिगारेट, उंट बिडी, विमल गुटखा अव्वा की सव्वा दराने अनधिकृतपणे विक्री करून लाखो रुपये कमाई करून घेत असलेल्या त्या दोन-तीन व्यक्तीं बाबत यावल पोलीस स्टेशनला तोंडी तक्रारी आलेल्या असून पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.
शहरात नगर परिषद कॉम्प्लेक्स मध्ये , जिनिंग प्रेस जवळील चोपडा रोडवरील पत्री शेडच्या एका दुकानात, पेट्रोल पंप परिसरात, आणि मेन रोड वरील जनता बँक परिसरातील काही ठराविक विक्रेते गायछाप पटेल जर्दापुडी, विमल गुटखा पुडी, सिगारेट पाकीट, 30 नंबर बिडी, उंट बिडी इत्यादी माल बिना वतीने आणि अव्वा क़ी सव्वा दराने ग्राहकांना बिनधास्तपणे त्यांच्या दुकानात स्वतः जाऊन पोच करून विक्री करीत असल्याने किरकोळ ग्राहकांमध्ये मोठा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
यात 10 रुपयांची गायछाप पटेल जर्दा पुडी 20 रुपयाला, पटेल जर्दा 10 रुपयाची पुडी 15 रुपयाला, सिगारेट पाकीट 90 रुपयाचे 120 रुपयाला, 30 नंबर बिडी बंडल 20 रुपयाचे 30 रुपयात, उंट बिडी बंडल 15 रुपयाचे 20 रुपयात अशाप्रकारे काळ्याबाजारात अव्वा की सव्वा दराने विक्री करण्यात येत आहे यावल शहरातील वरील ठिकाणचे 4 ते 5 जण पटेल जर्दा व गायछाप पटेल जर्दा पुडी, विमल गुटखा पुडी, बिड़ी, सिगारेट ग्राहकांना किरकोळ व्यवसायिकांना घरपोच दुकान पोच छुपा पद्धतीने बिनधास्तपणे सर्रास विक्री करून लाखो रुपयांची कमाई करून घेत आहे, जे दुकानदार जास्त भाव देत नाहीत त्यांना हे वरील 3 ते 4 कोणताही माल विक्री करीत नाहीत हे विशेष. यात यावल शहरातील एका व्यापार्याने गेल्या दोन महिन्यात विमल गुटखा, पटेल जर्दा, गायछाप पटेल जर्दा पुडी, सिगारेट इत्यादी म** चढ्या भावाने अनधिकृतपणे तसेच ग्राहकांना कोणतीही रितसर पावती, बील न देता विक्री करून 10 ते 15 लाख रुपयांची अवैध कमाई केल्याचे जनता बँक परिसरासह आय.डी.बी.आय. बँक परिसर आणि संपूर्ण यावल शहरात व्यापारी वर्तुळात बोलले जात आहे.
तरी यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी अन्न व औषध प्रशासन, विक्रीकर अधिकारी, आयकर अधिकारी, वजन व मापे निरीक्षक, यांच्यामार्फत संयुक्त मोहीम राबवून यावल शहरात चर्चेत असणाऱ्या त्या अवैध गुटखा विक्रेत्या विरुद्ध कडक कारवाई करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.