
ग्रा.पं. सदस्य तेजस पाटील ग्रामपंचायत प्रवेशद्वाराजवळ झाले नतमस्तक
ग्रा.पं. सदस्य तेजस पाटील ग्रामपंचायत प्रवेशद्वाराजवळ झाले नतमस्तक
लोकशाहीतील पवित्र ग्रामपंचायत कार्यालय मंदिराचा राखला आदर
यावल (सुरेश पाटील): नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्याने पहिल्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयात प्रवेश करताना ग्रामपंचायत कार्यालय प्रवेशद्वाराजवळ नतमस्तक होऊन प्रवेश केल्याने तरुण तडफदार ग्रामपंचायत सदस्य तेजस पाटील यांचे ग्रामस्थांतर्फे कौतुक करण्यात येत आहे.
शिरसाड ता यावल येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच निवड करता आज दि १२ रोजी पहिल्या सभेचे आयोजन करण्यात आले होते त्या निमित्ताने आज नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेले नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आपल्या कारकीर्दीतील पहिल्या दिवशी पहिले पाऊल ठेवणार होते ही सर्व सदस्यांच्या राजकीय जिवनातील आनंदाचा फार मोठा क्षण आहे. लोकशाही राज्यात गांवातील ग्रामपंचायत हे लोकशाहीचे पवित्र मंदिर आहे या लोकशाहीच्या मंदिरातून शासन स्तरावरील ग्रामविकासाच्या व जनतेच्या जिवनमान उंचावण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या योजना व उपक्रम राबवले जातात यातूनच गावाचा सर्वांगीण विकास साधला जातो या मंदिरातून जनता रुपी देवाची सेवा केली जाते. दरम्यान आपल्याला या जनता जनार्दनाची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून येथील प्रभाग क्रमांक चार मधून निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य तेजस धनंजय पाटील हे आज आपल्या ग्रामपंचायत सदस्य पदाचा कारकिर्दीच्या पहिल्या दिवशी चे पाऊल ग्रामपंचायत कार्यालयात आपले पाऊल टाकण्या टाकण्याअगोदर या लोकशाहीच्या मंदिरासमोर नतमस्तक झाले त्यांनी ग्रामपंचायतीच्या प्रवेश दारावर माथा टेकून लोकशाहीच्या मंदिराचे दर्शन घेतले,या कृतीमुळे तेजस पाटील यांच्या उच्चकोटीच्या अशा प्रगल्भ विचारसरणीची ग्रामस्थांना अनुभूती आली.यामुळे त्यांनी सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. तेजस पाटील हे माजी उपसरपंच धनंजय पाटील व जि.प.प्राथमिक शाळा शिरसाड च्या मुख्याध्यापिका संगिता पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहे.तेजस पाटील हे महाराष्ट्रातील सर्वात तरुण सहकार विभागातील संचालक आहेत.ते यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे सर्वात तरुण संचालक आहेत. तेजस पाटील यांच्या कडून गावाचा कायापालट नक्की होईल अशी आशा गावकरी मंडळीकडून व्यक्त करण्यात येत आहे.